दिव्या भारती पासून श्रीदेवीपर्यंत 5 अभिनेत्रींचा तडफडून शेवट, तिसऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल थक्क

प्रसिद्ध अभिनेत्रींचा तडफडून शेवट... 'या' 5 अभिनेत्रींचा अत्यंत वाईट अंत, तिसऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल थक्क..., निधनानंतर देखील अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...

दिव्या भारती पासून श्रीदेवीपर्यंत 5 अभिनेत्रींचा तडफडून शेवट, तिसऱ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल थक्क
फाईल फोटो
| Updated on: Aug 12, 2025 | 1:46 PM

झगमगत्या विश्वात कधी काय होईल काहीही सांगता येत नाही. आनंदी आणि उत्साही असलेल्या वातावरणात कधी दुःख पसरेल कधीही सांगता येत नाही. असं अनेकदा झालं आहे. दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी दुबईत लग्नासाठी गेलेल्या, त्यांचे काही शेवटचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले. पण पुढच्या क्षणी त्यांच्या निधनाची माहिती समोर आली. असं अनेक अभिनेत्रींसोबत झालं आहे. अशा 5 अभिनेत्री त्यांच्या मृत्यूनंतर फक्त बॉलिवूडला नाही तर, असंख्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला.

1990 च्या दशकात अभिनेत्री दिव्या भारती हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. वयाच्या 19 व्या वर्षी दिव्या भारती यशाच्या शिखरावर होती. पण करीयर यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीचं इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडून निधन झालं. पण आजही अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री जिया खान हिच्या निधनानंतर देखील सर्वत्र खळबळ माजली होती. अभिनेता आमिर खान स्टारर ‘गजनी’ आणि अक्षय कुमार स्टारर ‘हाउसफुल’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये नाव भक्कम करण्यापूर्वीच स्वतःला संपवलं. 3 जून 2013 रोजी अभिनेत्री मुंबईतील जुहू येथील तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली.

परवीन बाबी ही 1970 आणि 1980 च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होती. जानेवारी 2005 मध्ये, तिच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये ती मृतावस्थेत आढळली, शेजाऱ्यांना तिच्या दारावर वर्तमानपत्रे आणि किराणा सामान आढळले. शवविच्छेदन रिपोर्टमध्ये असं दिसून आलं, की मधुमेहामुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे तिचे अनेक अवयव निकामी झाले होते.

सुमारे सात वर्षांपूर्वी अभिनेत्री श्रीदेवी याचं निधन झालं होतं. श्रीदेवी यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली होती आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी यांना शेवटच्या क्षणी एखाद्या नवरी सारखं सजवण्यात आलं होते आणि त्यांच्या अंत्यसंस्काराला लाखो लोकांची गर्दी जमली होती.

‘बालिका वधू’ मालिकेत आंनदीच्या भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री प्रत्यूषा बनर्जी होती. तिच्या निधनाला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रत्यूषाच्या निधनानंतर बॉयफ्रेंड राहुल राज सिंह याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते.