सुनीता नव्हती तर गोळी कोणी मारली? शिल्पा शेट्टीचा गोविंदाला थेट प्रश्न, जाणून व्हाल थक्क
बायको घरी नव्हती तर, गोविंदाला कोणी मारली गोळी? शिल्पाने गोविंदाला का विचारला असा प्रश्न? जाणून व्हाल थक्क, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिल्पा शेट्टी हिच्या वक्तव्याची चर्चा...

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ च्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नुकताच शोचा ‘रक्षाबंधन’ स्पेशल एपिसोड प्रसारित झाला. ज्यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, बहीण शमिता शेट्टी हिच्यासोबत पोहोचली होती. एपिसोडमध्ये हुमा कुरैशी आणि भाऊ साकिब सलीम देखील उपस्थित होता. एपिसोडमध्ये विनोदवीर कपिल शर्मा याने गेल्या काही एपिसोडमधील घटनांचा उल्लेख केला. अभिनेता गोविंदा शोमध्ये आलेला तेव्हा त्याने सांगितलं की, बंदूक साफ करताना गोळी पायाला लगला…
पायाला गोळी लागल्यानंतर शिल्पा, गोविंदाला भेटण्यासाठी रुग्णालयात आली होती. शिल्पाने रुग्णालयात दाखल असलेल्या गोविंदाला विनोदी अंदाजात विचारलं की, ‘गोळी कशी लागली?’ जेव्हा गोळी लागली तेव्हा सुनीता कुठे होती? यावर गोविंदा म्हणाला, ‘गोळी लागली तेव्हा सुनिता मंदिरात गेली होती.’ तेव्हा शिल्पा विनोदी अंदाजात म्हणाली, ‘तर गोळी कोणी मारली?’ शिल्पाच्या या वक्तव्यावर जमलेल्यांना देखील हसू आलं…
कपिल शर्माने नुकताच झालेल्या एपिसोडमध्ये शिल्पा शेट्टीला पुन्हा तोच प्रसंग सांगितला. यावर अभिनेत्रीने खिल्ली उडवत म्हटलं, ‘कधी-कधी एखाद्या पुरुषाला संपूर्ण जग घाबरतं. पण तो पुरुष स्वतःच्या बायकोला घाबरतो… लग्नानंतरच पुरुषाचे डोळे खऱ्या अर्थाने उघडतात.’ सध्या शिल्पाने विनोदी अंदाजात केलेलं वक्तव्य तुफान चर्चेत आहे…
सांगायचं झालं तर, जवळपास 10 महिन्यांपूर्वी गोविंदा याच्या पायाला गोळी लागली होती. अभिनेता जेव्हा बंदूक कपाटात ठेवत होता, तेव्हा अभिनेत्याला गोळी लागली… असं सांगण्यात आलं. डॉक्टरांनी ऑपरेशन करुन अभिनेत्याच्या पायाला लागलेली गोळी काठली. घडना घडली तेव्हा गोविंदा घरी एकटाच होता.
अभिनेत्याची पत्नी सुनीता आहुजा जयपूरमध्ये होती. 29 सप्टेंबर रोजी ती खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी आली होती. 30 सप्टेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता तिने मंदिरात दर्शन घेतलं. 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता ती मुंबईला जाणार होती पण पहाटे 5 वाजता तिला गोविंदासोबत झालेल्या अपघाताची माहिती मिळाली.
शिल्पा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम तिच्या खासगी आणि फिटनेसबद्दल चर्चेत असते. आता शिल्पा मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
