Madhuri Dixit And Dr. Nene: मी तिच्या जीवावर जगत नाही, तिला कोणी ओळखत नव्हतं… डॉ. नेने माधुरीविषयी थेट असं का म्हणाले?

Madhuri Dixit: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षितचे पती डॉ. श्री राम नेने यांनी नुकताच एक खुलासा केला आहे. त्यांनी ते अमेरिकेत राहत असताना त्यांना आलेला अनुभवाबद्दल बोलून दाखवले आहे.

Madhuri Dixit And Dr. Nene: मी तिच्या जीवावर जगत नाही, तिला कोणी ओळखत नव्हतं... डॉ. नेने माधुरीविषयी थेट असं का म्हणाले?
| Updated on: Oct 25, 2026 | 8:15 AM

DR. Nene On Madhuri Dixit: बॉलीवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. माधुरी आणि डॉ.नेने यांची जोडी लोकांना प्रचंड आवडते. माधुरीने लग्नानंतर करिअरमधून ब्रेक घेतला आणि संसारासाठी डॉ. नेनेंबरोबर अमेरिकेला गेली. तिथे तिला दोन मुलेही झाली. त्यानंतर दोघेही कायमचेच भारतात परतले आणि स्थायिक झाले. यावेळी डॉ.नेने यांनी त्यांचे यशस्वी करिअर सोडले भारतात आले आणि आता ते इथे काम करत आहेत. आता डॉ. नेनेंनी जेव्हा माधुरी अमेरिकेत लग्नानंतर राहत होती तेव्हाचा किस्सा बोलून दाखवला आहे.

दोघेही बरेचदा सांगतात की ते पहिल्यांदा भेटले तेव्हा डॉ. नेने यांना भारतातील माधुरीच्या स्टारडमची थोडीही जाणीव नव्हती. कदाचित याच कारणामुळे त्यांना एकमेकांना व्यक्ती म्हणून समजून घेता आलं आणि त्यांचे नातं लगकरच बहरले. ‘CNBC-TV18’ ला दिलेल्या एका मुलाखतीत डॉ. नेनेंनी सांगितले की, “मी माधुरीचे पती असल्यामुळे लोक बऱ्याचदा मुलाखतींसाठी माझ्याकडे येतात. मात्र, तिच्या प्रसिद्धीचा (स्टारडमचा) मला कधीही दबाव किंवा भीती वाटली नाही. मला तिचा खूप अभिमान आहे.”

Loading...

सुखी संसाराचे गुपित विचारल्यावर डॉ. नेने म्हणाले, “मला वाटते की आम्ही दोघांनीही आयुष्यात जे काही मिळवलंय, त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. एका प्रसिद्ध अभिनेत्रीशी लग्न करणं हे आव्हानात्मक तर आहे, परिस्थितीनुसार गोष्टी जुळवून घ्याव्या लागतात, मात्र, माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाने मला या गोष्टीकडे योग्य दृष्टिकोनातून पाहण्यास मदत झाली. कधी कधी हे नक्कीच कठीण जाते, पण तुम्हाला जुळवून घ्यावच लागतं. मी UCLA मध्ये वैद्यकीय शिक्षण घेतले आहे, तिथे हॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांवर उपचार करायचो. त्या सेलिब्रिटींना फक्त तिथे एकच गोष्ट हवी असायची, ती म्हणजे त्यांची प्रायव्हसी,”

“आमचं लग्न अरेंज मॅरेज नव्हतं. आम्ही ३ महिने एकमेकांना डेट केलं आणि नंतर मी तिला लग्नाची मागणी घातली होती. तिने करिअरमध्ये काय केलंय याची मला थोडीही कल्पना नव्हती. मी लग्नाआधी तिचे चित्रपट पाहिले नव्हते पण जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मला व्यक्ती म्हणून खूप आवडली होती. जेव्हा तुम्ही तुमच्या सोलमेटला भेटता तेव्हा तुम्हाला ते आपसूकच जाणवतं.” नात्यात समान दर्जा राखण्याबद्दल डॉ. नेने म्हणाले, “सर्वात आधी तर तुम्ही प्रत्येक व्यक्तीला केवळ माणूस म्हणून वागवता. हे नेहमीच सोपे नसते. मला कधीकधी असे वाटतं की लोकांना फक्त तिच्या प्रसिद्धीमुळे माझी मुलाखत घ्यायची असते. पण, मला याने काही तसा फरक पडत नाही. जेव्हा लोक मला भेटतात, तेव्हा त्यांना जाणवतं कि मीही आयुष्यात काहीतरी साध्य केलं आहे.”

डॉ. नेने पुढे म्हणाले, “मी कोणाच्या तरी जीवावर किंवा प्रसिद्धीवर जगतोय, असं कोणी म्हणू शकत नाही. अमेरिकेत माधुरीला कोणीच ओळखत नव्हते आणि मी तिथे हार्ट सर्जन होतो. मला माहीत आहे की इथे तिचे स्थान एका वेगळ्याच पातळीवर आहे. मला तिचा खूप अभिमान आहे. तिच्यासारख्या प्रतिभावान व्यक्ती जगात खूप कमी आहेत.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us