AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3: रिलीजआधीच ‘दृश्यम 3’ची बंपर कमाई; 48 तासांत तुफान तिकिट विक्री, सर्व रेकॉर्ड मोडणार?

Drishyam 3: अजय देवगणच्या 'दृश्यम 3' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता ॲडव्हान्स बुकिंगमध्येच दमदार कमाई झाली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसाचं कलेक्शन विक्रमी असू शकतं, असं म्हटलं जातंय.

Drishyam 3: रिलीजआधीच ‘दृश्यम 3’ची बंपर कमाई; 48 तासांत तुफान तिकिट विक्री, सर्व रेकॉर्ड मोडणार?
Drishyam 3 Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 30, 2026 | 9:47 AM
Share

Drishyam 3: अजय देवगणचा बहुप्रतीक्षित ‘दृश्यम 3’ अर्थात ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच ॲडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 29 सप्टेंबरच्या दुपारपर्यंत चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमधून तब्बल 8.97 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली. पहिल्या तीन दिवसांसाठी मिळून हा आकडा 17.35 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ‘दृश्यम 3’च्या पहिल्या दिवसासाठी आतापर्यंत सुमारे 2.24 लाख तिकिटांची विक्री झाली असून 7505 शो बुक झाले आहेत. यामध्ये ब्लॉक सीट्सच्या रकमेसह तीन दिवसांच्या ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा 17.35 कोटी रुपये असल्याचं वृत्त आहे.

महाराष्ट्रातून पहिल्या दिवसाच्या बुकिंगमधून सुमारे 2.93 कोटी, तर दिल्लीमधून 2.19 कोटी रुपये मिळाले आहेत. या सुरुवातीच्या ट्रेंडमुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस ओपनिंगबाबतही चर्चा रंगली आहे. सध्याच्या ॲडव्हान्स बुकिंगच्या वेगानुसार भारतात चित्रपटाची ओपनिंग सुमारे 40 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतं, असा अंदाज काही ट्रेड रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने पहिल्या दिवशी भारतात 15.38 कोटी रुपये नेट कमावले होते. त्यानंतर पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपटाने 64.14 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे ‘दृश्यम 3’च्या जोरदार ॲडव्हान्स बुकिंगमुळे या जुन्या आकड्यांशी तुलना सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, ‘दृश्यम 3’ने रिलीजपूर्वीच ‘दृश्यम 2’च्या अंतिम ॲडव्हान्स बुकिंगच्या आकड्याला मागे टाकल्याचंही कळतंय. त्यामुळे चित्रपटाच्या ओपनिंगकडे आता प्रेक्षक आणि बॉक्स ऑफिस विश्लेषकांचं लक्ष लागलं आहे.

‘दृश्यम 3’मध्ये अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्ता यांच्यासह जॅकी श्रॉफ आणि काही नव्या कलाकारांचीही भर पडली आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी अभिषेक पाठक यांनी सांभाळली आहे. चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘दृश्यम’ फ्रँचायझीच्या आधीच्या दोन्ही भागांना मिळालेला प्रतिसाद पाहता तिसऱ्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रदर्शनानंतर ‘दृश्यम ३’ प्रत्यक्षात किती कमाई करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी