AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3 Review: मोहनलाल यांच्या ‘दृश्यम 3’मध्ये दम नाही, थरार हरवला; अजय देवगणला मिळाला मोठा फायदा

Drishyam 3: मोहनलाल यांच्या 'दृश्यम 3' या चित्रपटाने प्रेक्षकांची काही प्रमाणात निराशा केली आहे. त्यामुळे आता अजय देवगणचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Drishyam 3 Review: मोहनलाल यांच्या 'दृश्यम 3'मध्ये दम नाही, थरार हरवला; अजय देवगणला मिळाला मोठा फायदा
अजय देवगणImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 11, 2026 | 10:02 AM
Share

Drishyam 3 Review: मोहनलाल यांच्या बहुप्रतिक्षित ‘दृश्यम 3’ या मल्याळम चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा सस्पेन्स, दमदार कथानक आणि शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणारी उत्सुकता दिली होती. त्यामुळे तिसऱ्या भागाकडूनही तसाच जबरदस्त थरार अपेक्षित होता. मात्र, समोर आलेल्या समीक्षणानुसार हा चित्रपट त्या अपेक्षांवर पूर्णपणे खरा उतरत नसल्याचं चित्र आहे. विशेषतः कमकुवत स्क्रीनप्ले आणि अपेक्षित थ्रिलचा अभाव ही या चित्रपटाची मोठी समस्या ठरल्याचं म्हटलं जात आहे. ‘दृश्यम’ फ्रँचायजीची खरी ताकद म्हणजे साध्या कुटुंबाभोवती उभं राहणारं असामान्य रहस्य आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक खेळ. जॉर्जकुट्टी हे पात्र प्रेक्षकांच्या मनात याच कारणामुळे घर करून राहिलं. मोहनलाल यांनी या भूमिकेत साधेपणा, हुशारी आणि प्रसंगी परिस्थितीवर मात करण्याची क्षमता प्रभावीपणे दाखवली. मात्र, तिसऱ्या भागात आधीच्या चित्रपटांमध्ये जाणवलेली तीच धार कमी पडल्याची प्रतिक्रिया समोर येत आहे.

कथानकापेक्षा स्क्रीनप्ले ठरला कमकुवत

चित्रपटाच्या कथेत काही कल्पना आणि ट्विस्ट असले तरी त्यांची मांडणी अपेक्षेइतकी प्रभावी नसल्याचं समोर येतं. ‘दृश्यम’सारख्या फ्रँचायजीमध्ये केवळ रहस्य असणं पुरेसं नसतं, तर ते प्रेक्षकांसमोर कोणत्या पद्धतीने उलगडलं जातं हे अधिक महत्त्वाचं असतं. पहिल्या दोन भागांमध्ये प्रत्येक छोट्या घटनेला पुढील कथानकाशी जोडण्यात आलं होतं. त्यामुळे प्रेक्षक सतत विचार करत राहायचे की पुढे काय होणार? मात्र, ‘दृश्यम 3’मध्ये हा प्रभाव कमी झाल्याचं दिसतं. काही प्रसंग अपेक्षित परिणाम साधण्यात अपयशी ठरतात आणि त्यामुळे कथानकाचा वेगही काही ठिकाणी मंदावतो. चित्रपटाची मांडणी तितकी नावीन्यपूर्ण वाटत नाही आणि फ्रँचायजीच्या जुन्या फॉर्म्युलावरच अधिक भर दिल्याचं जाणवतं.

पहा ट्रेलर-

या सर्व कमतरतांमध्ये मोहनलाल यांचा अभिनय मात्र चित्रपटाची जमेची बाजू ठरतो. जॉर्जकुट्टीच्या भूमिकेत त्यांचा संयमी अभिनय पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतो. पात्राच्या चेहऱ्यावरचे भाव, संवादातील शांतपणा आणि परिस्थितीचा अंदाज घेण्याची त्याची पद्धत हे सगळं मोहनलाल यांनी प्रभावीपणे साकारलं आहे. मात्र, दमदार अभिनय असूनही कमजोर लिखाणामुळे त्याचा पुरेपूर फायदा चित्रपटाला मिळत नसल्याची भावना निर्माण होते. कारण ‘दृश्यम’च्या यशामागे केवळ कलाकारांचा अभिनय नव्हता, तर त्यामागे घट्ट बांधलेलं पटकथालेखन आणि प्रेक्षकांना सतत गुंतवून ठेवणारी कथा होती.

अजय देवगणच्या हिंदी ‘दृश्यम 3’कडेही लक्ष

मल्याळम ‘दृश्यम 3’च्या प्रतिक्रियांनंतर आता अजय देवगणच्या हिंदी व्हर्जनबद्दल उत्सुकता वाढली आहे. हिंदी ‘दृश्यम 3’ ही मल्याळम आवृत्तीची थेट पुनरावृत्ती नसून तिची कथा वेगळी असल्याचं अजय देवगणने स्पष्ट केलं आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी जवळपास अडीच वर्षे पटकथेवर काम केल्याचंही समोर आलं आहे. हिंदी व्हर्जनमध्ये अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार असून तब्बूसोबत जयदीप अहलावत आणि प्रकाश राज यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात विजयसमोर आणखी मोठं संकट उभं राहिल्याचं दिसतं.

एकूणच, मोहनलाल यांच्यासारखा सुपरस्टार आणि लोकप्रिय फ्रँचायझी असूनही ‘दृश्यम 3’च्या कथानकाला अपेक्षित धार मिळाली नाही, अशी प्रतिक्रिया समोर येत आहे. ‘दृश्यम’च्या चाहत्यांसाठी हा भाग अपेक्षाभंग करणारा ठरतो की काही प्रेक्षकांना त्यातील वेगळा दृष्टिकोन आवडतो, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Follow Us
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार...
आदित्य ठाकरे यांचा कर्जत दौरा, वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, क्लिप बनवणारा.
500 कोटींची AI ऑडिओ क्लिप... मनोज जरांगे स्पष्टच बोलले, ही क्लिप बनवणाऱ्या व्यक्तीबाबत मोठी माहिती