Drishyam 3 Review : ‘दृश्यम 2’ पेक्षा तिसरा भाग दमदार की बकवास? थिएटरमध्ये पाहण्याआधी वाचा हा फर्स्ट रिव्ह्यू

Drishyam 3 : 'दृश्यम' सिनेमाचे दोन भाग यशस्वी ठरल्यानंतर आता तिसरा भाग 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. त्याआधी सिनेमाचा फर्स्ट रिव्ह्यू समोर आला आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे... जाणून घ्या कसा आहे सिनेमा...

Drishyam 3 Review : दृश्यम 2 पेक्षा तिसरा भाग दमदार की बकवास? थिएटरमध्ये पाहण्याआधी वाचा हा फर्स्ट रिव्ह्यू
Drishyam 3
| Updated on: Oct 02, 2026 | 8:28 AM

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगण स्टारर ‘दृश्यम 3’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहते सिनेमाच्या प्रतिक्षेत होते. अखेर सिनेमा प्रदर्शित झाला आणि चाहत्यांनी सिनेमाला डोक्यावर घेतलं. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये सिनेमाचे 12 लाखांपेक्षा अधिक तिकिटांची विक्री झाली. 27 सप्टेंबर रोजी सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. अशात फक्त 5 दिवसांत सिनेमाने मोठी मजल मारली आहे. यावर आता सिनेमा विश्लेषक आणि ट्रेड एक्सपर्ट तरण आदर्श यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘दृश्यम 3’चा फार्स्ट रिव्ह्यू दिला आहे.

बॉक्स ऑफिसवर रुल करणार ‘दृश्यम 3’…

Loading...

तरण आदर्श यांनी एक्सवर ‘दृश्यम 3’ चा रिव्ह्यू दिला आहे. तरण आदर्श म्हणतात, ‘दृश्यम द कनक्लूजन… उत्तम आहे… सिनेमासाठी 4.5 रेटिंग्स… सिनेमा खरंच खूप चांगला आहे… 2026 मधील सर्वांत चांगल्या सिनेमांपैकी एक ‘दृश्यम’ सिनेमा ठरणार आहे… सिनेमा नक्कीच ब्लॉकबस्टर होणार आहे.

‘दृश्यम 3’ सिनेमाचं दिग्दर्शन?

याचसोबत तरण आदर्श यांनी पुढे दिग्दर्शनापासून ते अभिनयापर्यंत सर्वच गोष्टींचं कौतुक केलं. दिग्दर्शनाबद्दल ते लिहितात, ‘दिग्दर्शक अभिषेक पाठक. त्यांनी सिनेमाचा दुसरा भागही दिग्दर्शित केला होता, त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की आजच्या सर्वोत्तम कथाकारांमध्ये त्यांची गणना का होते? ते या फ्रँचायझीचं मूळ समजतात. जुन्या फॉर्म्युल्याची पुनरावृत्ती न करता ते कथा पुढे नेतात. खरं तर, दिग्दर्शन आणि लेखन हे या सिनेमाचे दोन सर्वात मजबूत पैलू म्हणून समोर येतात.’

 

 

जय देवगणसह इतर अभिनेत्यांचा अभिनय

तरण पुढे लिहितात, ‘सिनेमाचा सर्वात महत्त्वाची भाग म्हणजे पहिल्या हाफमधील अजय देवगण आणि जयदीप अहलावत यांच्यातील आमना-सामना. फारच कमाल आहे… यासाठी तर टाळ्याच बजायला हव्यात. कोर्टरूमचे सीन्स देखील सिनेमाचं एक मोठे वैशिष्ट्य आहेत. खरंतर अजय देवगण आणि त्याच्या कुटुंबासोबत प्रकाश राज यांचा सर्वात पहिला सीन सुद्धा एक शानदार क्षण आहे.’

काय आहे ‘दृश्यम 3’ चा महत्त्वाचा दुवा?

दरम्यान, तरण आदर्श यांनी ‘दृश्यम 3’ या सिनेमाच्या महत्त्वाच्या दुव्याचाही खुलासा केला आणि सांगितलं, ‘अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकर या भूमिकेत परतत आहेत. या फ्रँचायझीचा जीव आणि ‘दृश्यम – द कन्क्लूजन’चा मुख्य दुवा आहेत. त्यांनी ही कठीण भूमिका अत्यंत अप्रतिमरीत्या साकारली आहे. विशेषतः जयदीप अहलावतसोबत इंटरव्हलच्या आधीचा सीन प्रेक्षकांना तो सिनेमा वारंवार पाहण्यास नक्कीच भाग पाडेल.’

जयदीप यांच्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर, क्रिटिक लिहितात, ‘जयदीप अहलावत ‘दृश्यम’ सिनेमासाठी भक्कम पाया ठरले आहे. त्यांनी त्यांच्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला आहे. ही सिनेमातील सर्वात मोठी बाजू आहे…’ तब्बू हिच्या भूमिमकेबद्दल म्हणाले, ‘तब्बूचा राग, दुःख आणि बदल्याची भावना.. या सर्व गोष्टींमुळे कळतं की, या रोलसाठी ती का परफेक्ट आहे…’

तरण आदर्श पुढे लिहितात, ‘प्रकाश राज खरंच कमाल आहेत. त्यांचा दबदबा आणि स्क्रिनवरील त्यांची कमगिरी कथेत आणखी वजन टाकत आहे. श्रिया सरन देखील सुपर आहेत. रजत कपूर, कमाल सावंत, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव यांनी देखील शानदार काम केलं. ‘

‘दृश्यम 3’ सिनेमा पाहायचा की नाही?

सिनेमात अजम देवगण आणि जयदीप अहलावत यांच्यातील कांटे की टक्कर पाहायला मजा येत आहे. दोघे शेवटपर्यंत एकमेकांनी रचलेला कट सजण्यात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. पण सिनेमाचा अंत तुम्हाला थक्क करले. सिनेमाची सुरुवात थेडी हळूबार होते. पण पुढे काय होणार… याची उत्सुकता शिगेला पोहोचवणारी आहे… जर तुम्हाला सस्पेंस सिनेमे आवडत असतील, ज्याचं रहस्य शेवटपर्यंत कळत नाही, तर ‘दृश्यम 3’ तुम्ही नक्कीच पाहायला पाहिजे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us