AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Rampal | 3 तासांपासून चौकशी सुरूच, एनसीबीकडून अर्जुन रामपालवर प्रश्नांची सरबत्ती!

मागील 3 तासांपासून त्याची चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान अर्जुनला ‘तू ड्रग्ज घेतोस का?’, असा प्रश्न केल्याचे कळते आहे.

Arjun Rampal | 3 तासांपासून चौकशी सुरूच, एनसीबीकडून अर्जुन रामपालवर प्रश्नांची सरबत्ती!
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 13, 2020 | 2:54 PM
Share

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी (Drugs Case) अभिनेता अर्जुन रामपालची (Arjun Rampal) एनसीबी चौकशी सुरू आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान अर्जुन रामपाल एनसीबी कार्यालयात दाखल झाला होता. मागील 3 तासांपासून त्याची चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान अर्जुनला ‘तू ड्रग्ज घेतोस का?’, असा प्रश्न केल्याचे कळते आहे. याव्यतिरिक्त त्यांच्या घरात बंदी असलेल्या गोळ्या आढळल्याने त्या संदर्भातही प्रश्न केले जात आहे (Drugs Case Arjun Rampal Interrogation update questions by NCB).

अर्जुन रामपाल यांची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रियड्स (Gabriella demetriades)  हिची एनसीबीने दोनवेळा चौकशी केली. यावेळी अभिनेता अर्जुन रामपाल यालाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. अर्जुन रामपालला शुक्रवारी सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

सोमवारी (9 नोव्हेंबर) अर्जुन रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर एनसीबी पथकाने छापा टाकला होता. या धाडीत अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली. या दरम्यान त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल 7 ते 8 तास हे धाडसत्र सुरू होते. त्यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या. तसेच, अर्जुनच्या वाहन चालकाला ताब्यात घेतले होते (Drugs Case Arjun Rampal Interrogation update questions by NCB).

एनसीबीकडून ‘या’ प्रश्नांची प्रश्नांची सरबत्ती

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन रामपालला ‘तू ड्रग्ज घ्यायचा की नाही’, असा सवाल केला जात आहे. याच बरोबर, ‘मैत्रिण गॅब्रिएला डेमेट्रियड्स हिचा भाऊ अ‍ॅगिसिलोस ड्रग्ज घेतो, हे तुला माहित होते का?’, ‘बंदी असणारी औषधे तुझ्या घरी कशी आली?’, अशा प्रश्नांची उत्तरे अर्जुनकडून मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या 3 तासांपासून त्याची कसून चौकशी सुरू आहे (Drugs Case Arjun Rampal Interrogation update questions by NCB).

अर्जुनच्या मित्राला अटक

एनसीबी बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात त्यांच्या तपासणीची व्याप्ती सातत्याने वाढवत आहे. दरम्यान, अर्जुन रामपालच्या हालचालींवर लक्ष ठेवून असणाऱ्या एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टेलला एनसीबीने अटक केली आहे. अर्जुन रामपाल ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी एनसीबीसमोर हजर होणार आहे आणि त्याचवेळी या प्रकरणात त्याच्या मित्राला अटक करण्यात आल्याने त्याच्या अडचणींत देखील वाढ झाली आहे.

पॉल हा ऑस्ट्रेलियन असून, तो एका मोठ्या बांधकाम कंपनीत काम करतो. तो आर्किटेक्ट आहे. त्याचप्रमाणे एनसीबी अधिकाऱ्यांनी अर्जुन रामपाल यांच्या घरी सोमवारी धाड टाकली होती. यावेळी काही टॅबलेट त्या ठिकाणी सापडले होते. या टॅबलेट भारतात विकण्यास बंदी आहे. त्या अर्जुन रामपाल यांनी त्या टॅबलेटबाबत अजून काही खुलासा केलेला नाही. त्या टॅबलेटबाबत त्यांनी योग्य तो खुलासा न केल्यास त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(Drugs Case Arjun Rampal Interrogation update questions by NCB)

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...