Ekta Kapoor: ‘पत्ता सांग, आम्ही कपडे दान करतो’; अनकम्फर्टेबल ड्रेसमुळे एकता कपूर ट्रोल

| Updated on: Jan 08, 2023 | 12:05 PM

एकता कपूरच्या फॅशनची नेटकऱ्यांची उडवली खिल्ली; म्हणाले 'सुशांतच्या नावावर तुलाही कपडे दान करू'

Ekta Kapoor: पत्ता सांग, आम्ही कपडे दान करतो; अनकम्फर्टेबल ड्रेसमुळे एकता कपूर ट्रोल
एकता कपूरच्या फॅशनची नेटकऱ्यांची उडवली खिल्ली
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध निर्माती एकता कपूरने नुकतीच तिच्या एका खास मैत्रिणीला भेट दिली. टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोग्राला तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल शुभेच्छा देण्यासाठी ती तिच्या घरी पोहोचली. मात्र यावेळी एकताने परिधान केलेल्या ड्रेसने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. एकताला तिच्या अनकम्फर्टेबल ड्रेसमुळे ट्रोलिंगचा सामना करावा. पापाराझींनी एकताचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी एकताला कपडे दान करण्याची गरज असल्याचं म्हटलंय.

‘एवढ्या पैशांचा काय उपयोग? जर तुम्हाला कपडे परिधान करण्याची अक्कल नसेल तर’ असं एका युजरने लिहिलं. ‘त्या ड्रेसमध्ये तिला सहज वावरता येत नाहीये, तरीसुद्धा असे कपडे का घालतात’ असा सवाल दुसऱ्याने केला. ‘ही तर WWF ची रेसलर वाटतेय’ अशीही एकाने खिल्ली उडवली. ‘आम्ही सुशांत सिंह राजपूतच्या नावावर कपडे दान करत आहोत. तुझासुद्धा पत्ता सांग, आम्ही तुलासुद्धा कपडे दान करू’, असं नेटकऱ्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून एकता तिच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील बोल्ड सीरिजमुळेही चर्चेत आहे. गंदी बात, एक्सएक्सएक्स, बेकाबू, रागिनी एमएमएस 2 यांसारख्या तिच्या सीरिज आणि चित्रपटांना सर्वोच्च न्यायालयानेही फटकारलं होतं.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट लिहित एकताने अप्रत्यक्षपणे निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर निशाणा साधला होता. एकताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली होती. ‘तुम करो तो लस्ट स्टोरीज और हम करे तो गंदी बात’, अशा शब्दांत तिने करण जोहरला सुनावलं होतं.

अल्ट बालाजीवरील ‘XXX’ या सीरिजचं प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. “यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे. तुम्ही या देशाच्या युवा पिढीचा मेंदू दूषित करत आहात. ओटीटीवरील हा कंटेट सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना कोणता पर्याय देत आहात”, असा सवाल कोर्टाने एकता कपूरला केला होता. या सीरिजमध्ये सैनिकांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह दृश्ये दाखवल्याचा आरोप आहे.