Top 5 News | ड्रामा क्वीन राखी सावंतला सलमानच्या हातावर बंधायचीय राखी ते रणदीप हुडावर लेखिकेचे गंभीर आरोप, वाचा मनोरंजन विश्वातल्या घडामोडी…

जर तुम्ही शुक्रवार म्हणजेच 20 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

Top 5 News | ड्रामा क्वीन राखी सावंतला सलमानच्या हातावर बंधायचीय राखी ते रणदीप हुडावर लेखिकेचे गंभीर आरोप, वाचा मनोरंजन विश्वातल्या घडामोडी...
Top 5 News

मुंबई : दररोज मनोरंजन विश्वात काही छोट्या-मोठ्या बातम्या चर्चेत असतातच. चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सशी संबंधित बातम्या जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. मनोरंजन विश्वातील बातम्यांच्या दृष्टीनेही शुक्रवार खूप महत्त्वाचा होता. मात्र, जर तुम्ही शुक्रवार म्हणजेच 20 ऑगस्ट 2021च्या मनोरंजन विश्वाशी संबंधित बातम्या चुकवल्या असतील, तर तुम्ही त्या मनोरंजन टॉप 5 मध्ये वाचू शकता.

ड्रामा क्वीन राखी सावंत म्हणतेय, ‘मला भाईजान सलमान खानला राखी बांधायचीय, कारण…’

यावर्षी 22 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) देखील या सणाबद्दल खूप उत्साहि आहे. ‘बिग बॉस’ फेम डान्सर आणि एंटरटेनर राखी सावंत म्हणतेय की, तिला यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी सलमान खानच्या मनगटावर राखी बांधायची आहे. राखी म्हणाली की, सलमान खान (Salman Khan) तिला सक्ख्या भावाप्रमाणे मदत करत आहे. राखी म्हणते की, सलमान भाईने माझ्या आईच्या उपचाराला मदत केली आणि तिला नवीन जीवन दिले.

अभिनेता रणदीप हुडा मोठ्या अडचणीत, पटकथा लेखिकेने भरपाई म्हणून मागितले 10 कोटी!

एका पटकथा लेखिकेने अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hooda) याच्यावर तिची स्क्रिप्ट परत न केल्याचा आणि नंतर तिला धमकी दिल्याचा आरोप केला आहे. प्रिया शर्मा, ज्या एक गीतकार देखील आहेत, त्यांनी आता अभिनेत्याला कायदेशीर नोटीस पाठवून नुकसान भरपाई म्हणून 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे. एवढेच नाही, तर माध्यमांच्या अहवालानुसार प्रिया यांनी रणदीपला जाहीर माफी मागायला देखील सांगितले आहे. त्यांनी आपल्या आरोपात असा दावा केला आहे की, अभिनेता रणदीप हुडा आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी त्यांना एकत्र काम करण्यास राजी केले आणि त्यांनी गेल्या 15 वर्षांमध्ये लिहिलेली पटकथा आणि काही गाणी आपल्या ताब्यात घेतली.

शेवट नव्हे, ही तरी नवी सुरुवात! ‘या’ दिवशी ‘देवमाणूस’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ने (Devmanus) नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेच्या एका क्लायमॅक्स प्रोमोमध्ये डॉक्टरला अर्थात देवीसिंग फाशी दिल्याचे दिसले होते. ‘देवमाणूस’ या मालिकेचा दोन तासांचा शेवटचा आणि विशेष भाग काल (15 ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. मात्र, यात असे काहीही दाखवले गेले नाही. उलट शेवट दाखवलेल्या कथानकामुळे आता या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार, असे म्हटले जात आहे. मालिका सध्या ऑफ एअर गेली आहे. मालिकेत प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मात्र, या मालिकेचा दुसरा सीझन येणार का? आणि आला तर कधी येणार?, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. ,मात्र आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. एका लोकप्रिय सोशल मीडिया पेजने या संदर्भात पुष्टी केली आहे. पुढच्या सहा महिन्यात या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सौदी अरेबिया, कतार आणि कुवैतमध्ये अक्षयच्या ‘बेल बॉटम’वर बंदी!

बॉलिवूड अभिनेता अक्षर कुमार (Akshay Kumar) याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) 19 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. अक्षयसोबत वाणी कपूर (Vani Kapoor), हुमा कुरेशी (Huma Qureshi) आणि लारा दत्ता (Lara Dutta) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘बेल बॉटम’ केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांमध्ये रिलीज झाला आहे. परंतु, अक्षयच्या चित्रपटावर सौदी अरेबिया, कुवैत आणि कतारमध्ये बंदी घालण्यात आल्याचे वृत्त येत आहे आणि याचे कारण म्हणजे चित्रपटाती एक सीन जो तेथील सेन्सॉर बोर्डाच्या मते ते दाखवणे योग्य नाही.

‘बाजिंद’ रंगात रंगणार सैराटच्या ‘लंगड्या-सल्या’ची जोडी, मोठ्यापडद्यानंतर आता छोटा पडदा गाजवणार!

मैत्रीच्या अनेक गोष्टींपैकी एक जी नेहमीच आपल्या आठवणीत राहते ती मैत्री म्हणजे परश्या, सल्या आणि लंगड्याची ‘सैराट’ मैत्री. पुन्हा एकदा सल्या म्हणजे अरबाज (Arbaz Shaikh) आणि लंगड्या म्हणजे तानाजी (Tanaji Galgunde) आपल्या मैत्रीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. सैराट चित्रपटानंतर ते पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. आपल्या पहिल्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर पुन्हा तानाजी आणि अरबाज कुठे दिसतील कोणत्या चित्रपटात कोणत्या माध्यमात दिसतील असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. याला उत्तर म्हणजे झी मराठी वाहिनीवर येणारी नवी मालिका ‘बाजिंद’. या मालिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांना या जोडीची धमाल पाहायला मिळणार आहे. ‘बाजिंद’ या मालिकेत दोघे महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

हेही वाचा :

18 व्या वर्षी लग्न, 25 व्या वर्षी पदरी तीन मुलं, घटस्फोटानंतर सिंगल मदर बनून मुलांचा सांभाळ करतेय कनिका कपूर

 ‘नेटफ्लिक्स’वरील ‘या’ चित्रपटांसह, रक्षाबंधनाच्या सोहळ्याला द्या ‘फिल्मी’ स्पर्श!

Published On - 10:35 am, Sat, 21 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI