AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raksha Bandhan  Special Movies | ‘नेटफ्लिक्स’वरील ‘या’ चित्रपटांसह, रक्षाबंधनाच्या सोहळ्याला द्या ‘फिल्मी’ स्पर्श!

भावा-बहिणींचे नाते उलगडून दाखविणाऱ्या लोकप्रिय चित्रपटांपासून ते हृदयस्पर्शी कलाकृतींपर्यंत, ‘नेटफ्लिक्स’वर रक्षाबंधनानिमित्त विशेष चित्रपट सादर केले जाणार आहेत. तुम्ही भावंडांसोबत राहात असा किंवा दूर, ‘नेटफ्लिक्स आणि चिल’ ही एक उत्तम कल्पना आहे!

Raksha Bandhan  Special Movies | ‘नेटफ्लिक्स’वरील ‘या’ चित्रपटांसह, रक्षाबंधनाच्या सोहळ्याला द्या ‘फिल्मी’ स्पर्श!
Netflix Movies
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 7:47 AM
Share

Raksha Bandhan  2021 Special Movies :  तुम्ही तुमच्या भावंडांवर प्रेम करू शकता किंवा त्यांचा द्वेष करू शकता; मात्र काहीही झाले तरी भावंडांकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. एकमेकांशी भांडणे, एकमेकांची गुपिते सांभाळणे आणि नेहमी एकमेकांच्या पाठिशी उभे राहणे, हे तुमचे भावंडांशी असलेले विशेष नाते या रक्षाबंधनाच्या दिवशी साजरे करा आणि त्याकरीता काही निवडक चित्रपटांचा आनंद घ्या.

भावा-बहिणींचे नाते उलगडून दाखविणाऱ्या लोकप्रिय चित्रपटांपासून ते हृदयस्पर्शी कलाकृतींपर्यंत, ‘नेटफ्लिक्स’वर रक्षाबंधनानिमित्त विशेष चित्रपट सादर केले जाणार आहेत. तुम्ही भावंडांसोबत राहात असा किंवा दूर, ‘नेटफ्लिक्स आणि चिल’ ही एक उत्तम कल्पना आहे!

दिल धडकने दो

एक संपूर्ण कौटुंबिक नाट्य असलेला हा प्रेक्षकांचा नेहमीचा आवडता चित्रपट आहे. यातील नात्यांचे वास्तववादी, परंतु संवेदनशील चित्रण हृदयाला भिडणारे आहे. रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा हे यामध्ये एकमेकांच्या पाठिशी उभ्या राहणाऱ्या भावंडांच्या भूमिकेत झळकले आहेत.

द स्काय इज पिंक

ही सुंदर विणलेली कथा एका कुटुंबाच्या संघर्षांबद्दल आहे. या कुटुंबातील मुलगी दुर्मिळ आजारामुळे त्रस्त आहे. यातील भावनिक चढ-उताराच्या कथेत भावंडांमधील बंध अधोरेखित होतात. हे बंध कालांतराने परिपक्व होताना यात दाखवण्यात आले आहेत.

त्रिभंग

नातेसंबंधांच्या या हृदयस्पर्शी कथेत स्त्रियांचे मनोभाव व्यक्त करण्यात आले आहेत. महिला सक्षमीकरणाचा एक अंतर्निहित संदेश असलेला हा चित्रपट बघण्याजोगा आहे.

दंगल

बॉलिवूड अभिनेता आमिर खान अभिनीत या चित्रपटात कुस्तीला मध्यवर्ती स्थान आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या खेळामध्ये आपल्या मुलींनी चॅम्पियन व्हावे, यासाठी धडपडणाऱ्या वडिलांची मर्मभेदी कथा यात आहे. आपल्या वडिलांच्या प्रबळ इच्छाशक्तीला सामोरे जात असताना दोन बहिणींनी स्वीकारलेले बदल आणि त्या दोघींमधील नातेसंबंध यांचे सुंदर प्रदर्शन असलेला ‘दंगल’ पाहणे आवश्यक आहे.

लिटल वूमन

ही वयात येणाऱ्या मुलींची कथा लुईसा मे अल्कोट यांनी लिहिलेल्या ‘क्लासिक’वर आधारित आहे. अमेरिकेत 19व्या शतकातील गृहयुद्धाच्या वेळी रचलेली ही कथा चार बहिणींच्या आयुष्यांचे वर्णन करते. यातील प्रत्येक मुलगी स्वतःच्या अटींवर जीवन जगण्यास आसुसलेली असते.  ही कथा कालातीत आणि समकालीनही आहे.

येस डे

पालक आपल्या मुलांना किती वेळा ‘नाही’ म्हणतात? या चित्रपटाची कथा एका आई-वडिलांभोवती फिरते. ते प्रत्येक वेळी मुलांना ‘नाही’ म्हणत राहतात आणि मुलांच्या सर्वात विचित्र अशा विनंतीला ‘हो’ म्हणायचे ठरवतात! विनोदी गोंधळ आणि सहज-सोप्या संवादांनी भरलेला एखादा हलका-फुलका चित्रपट पाहायचा असेल, तर हा एक अगदी योग्य असा पर्याय आहे.

हेही वाचा :

सौदी अरेबिया, कतार आणि कुवैतमध्ये अक्षयच्या ‘बेल बॉटम’वर बंदी! नेमकं कारण काय?

 एक अशी कथा जिने समाजातील जातपात भेदभाव करणाऱ्यांना लगावली चपराक! वाचा कसा आहे रिंकूचा ‘200 हल्ला हो’

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.