‘बाजिंद’ रंगात रंगणार सैराटच्या ‘लंगड्या-सल्या’ची जोडी, मोठ्यापडद्यानंतर आता छोटा पडदा गाजवणार!

मैत्रीच्या अनेक गोष्टींपैकी एक जी नेहमीच आपल्या आठवणीत राहते ती मैत्री म्हणजे परश्या, सल्या आणि लंगड्याची ‘सैराट’ मैत्री. पुन्हा एकदा सल्या म्हणजे अरबाज (Arbaz Shaikh) आणि लंगड्या म्हणजे तानाजी (Tanaji Galgunde) आपल्या मैत्रीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

‘बाजिंद’ रंगात रंगणार सैराटच्या ‘लंगड्या-सल्या’ची जोडी, मोठ्यापडद्यानंतर आता छोटा पडदा गाजवणार!
तानाजी आणि अरबाज
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 11:32 AM

मुंबई : मैत्रीच्या अनेक गोष्टींपैकी एक जी नेहमीच आपल्या आठवणीत राहते ती मैत्री म्हणजे परश्या, सल्या आणि लंगड्याची ‘सैराट’ मैत्री. पुन्हा एकदा सल्या म्हणजे अरबाज (Arbaz Shaikh) आणि लंगड्या म्हणजे तानाजी (Tanaji Galgunde) आपल्या मैत्रीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. सैराट चित्रपटानंतर ते पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

आपल्या पहिल्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर पुन्हा तानाजी आणि अरबाज कुठे दिसतील कोणत्या चित्रपटात कोणत्या माध्यमात दिसतील असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. याला उत्तर म्हणजे झी मराठी वाहिनीवर येणारी नवी मालिका ‘बाजिंद’. या मालिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांना या जोडीची धमाल पाहायला मिळणार आहे. ‘बाजिंद’ या मालिकेत दोघे महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

प्रेमाचा रंग ‘बाजिंद’

आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे.

मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी ही कृष्णा आपली मुख्य नायिका आहे. यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे. राया आणि कृष्णा यांच्या बेभान, बेधुंद प्रेमाची गोष्ट हळदीचा कारखाना, फुललेली शेती अशा गावाकडील पार्श्वभूमीवर खुलणार आहे. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत.

‘बाजिंद’ म्हणजे काय?

झी मराठी वाहिनीवर ‘मन झालं बाजिंद’ ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेत राया आणि कृष्णाची एक अनोखी प्रेम कथा दाखवण्यात येणार आहे. पण मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक मात्र बुचकळ्यात पडले आहेत. त्यांना मालिकेच्या नावातील ‘बाजिंद’ या शब्दाचा अर्थ मात्र माहिती नाहीये. उभा महाराष्ट्र गुगलवर ‘बाजिंद’ या नावाचा नेमका अर्थ काय? हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत बाजिंद हा शब्द मालिकेतील नायक रायासाठी वापरण्यात आला आहे. या शब्दाचा अर्थ इथे जिद्दी असा होतो. मालिकेत राया हा अतिशय जिद्दी दाखवण्यात येणार आहे.

(Sairat fame Tanaji galgunde and arbaz shaikh to come together once again for new Serial Bajind)

हेही वाचा :

स्टँडअप कॉमेडियन बनून लोकांना हसवलं, आता अभिनयात नशीब आजमावतोय झाकीर खान

 सुशांतसोबतच्या ‘काय पो चे’ने मिळवून दिली ओळख, वाचा कसा होता अमृता पुरीचा चित्रपट प्रवास…

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.