Happy Birthday Zakir Khan | स्टँडअप कॉमेडियन बनून लोकांना हसवलं, आता अभिनयात नशीब आजमावतोय झाकीर खान

स्टँडअप कॉमेडियन झाकीर खान (Happy Birthday Zakir Khan) आता सर्वत्र परिचित आहे. त्याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. झाकीरने आपल्या कॉमेडी टायमिंगने प्रत्येकाची मने जिंकली आहेत.

Happy Birthday Zakir Khan | स्टँडअप कॉमेडियन बनून लोकांना हसवलं, आता अभिनयात नशीब आजमावतोय झाकीर खान
झाकीर खान

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन झाकीर खान (Happy Birthday Zakir Khan) आता सर्वत्र परिचित आहे. त्याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. झाकीरने आपल्या कॉमेडी टायमिंगने प्रत्येकाची मने जिंकली आहेत. आज (20 ऑगस्ट) झाकीर खान त्याचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे. याच खास निमित्ताने जाणून घेऊया झाकीरच्या स्टँड-अप कॉमेडियन ते अभिनेत्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल…

झाकीर खानच्या स्टँडअप कॉमेडीची खास गोष्ट म्हणजे ती मध्यमवर्गीय कुटुंबाला जोडते. त्याची विनोदी शैली इतर स्टँडअप कॉमेडियनपेक्षा बरीच वेगळी आहे, ज्यामुळे त्याने स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे.

रेडिओमधून केली करिअरची सुरुवात

झाकीर खान हा नेहमीच विनोदाचा शौकीन होता. एफएम रेडिओ चॅनेलमध्ये कॉपीरायटर रिसर्चर म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. जिथे त्याने जवळपास 4 वर्षे काम केले. कॉमेडी सेंट्रल चॅनेलवर ‘इंडियाज बेस्ट स्टँड अप कॉमेडियन’ हा शो जिंकल्यावर झाकीरचे आयुष्य बदलले. या शो नंतर झाकीरने कधीही मागे वळून पाहिले नाही.

ऑन एअर विथ AIB मध्ये झळकला

हा शो जिंकल्यानंतर झाकीरला AIB च्या YouTube चॅनेलवरील एका नवीन शोमध्ये काम करण्याची ऑफर देण्यात आली. हा शो यूट्यूबवर चांगलाच पसंत केला गेला. या व्हिडीओच्या माध्यमातून झाकीरची लोकप्रियता खूप वाढली.

आता जगभरातील करतो शो

झाकीर खानला त्याच्या स्टँडअप कॉमेडीमुळे बरीच ओळख मिळाली आहे. त्यानंतर त्याने जगभरात अनेक शो केले आहेत. तो अजूनही जगभरात स्टँडअप शो करतो. झाकीरच्या शोची तिकिटे देखील लगेचच विकली जातात.

अभिनेता म्हणून आजमावतोय नशीब

स्टँडअप कॉमेडियननंतर झाकीर खान आता अभिनेता बनला आहे. त्याने वेब सीरीजमध्ये काम केले आहे. ‘चाचा विधायक है’ या वेब सीरीजने त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेचा पहिला सीझन प्रचंड गाजला. त्यानंतर झाकीर त्याच्या दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

(Happy Birthday Zakir Khan becoming a standup comedian and making people laugh now trying his luck in acting)

हेही वाचा :

विकी कौशल-कतरिनाच्या साखरपुड्याची चर्चा ते ‘KBC13’च्या हॉट सेटवर विराजमान होणार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग, वाचा मनोरंजन विश्वातील घडामोडी..

Happy Birthday Amrita Puri | सुशांतसोबतच्या ‘काय पो चे’ने मिळवून दिली ओळख, वाचा कसा होता अमृता पुरीचा चित्रपट प्रवास…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI