शेवट नव्हे, ही तरी नवी सुरुवात! ‘या’ दिवशी ‘देवमाणूस’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

मालिका सध्या ऑफ एअर गेली आहे. मालिकेत प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मात्र, या मालिकेचा दुसरा सीझन येणार का? आणि आला तर कधी येणार?, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. ,मात्र आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शेवट नव्हे, ही तरी नवी सुरुवात! ‘या’ दिवशी ‘देवमाणूस’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार!
देवमाणूस
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Aug 20, 2021 | 12:46 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ने (Devmanus) नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेच्या एका क्लायमॅक्स प्रोमोमध्ये डॉक्टरला अर्थात देवीसिंग फाशी दिल्याचे दिसले होते. ‘देवमाणूस’ या मालिकेचा दोन तासांचा शेवटचा आणि विशेष भाग काल (15 ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. मात्र, यात असे काहीही दाखवले गेले नाही. उलट शेवट दाखवलेल्या कथानकामुळे आता या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार, असे म्हटले जात आहे.

मालिका सध्या ऑफ एअर गेली आहे. मालिकेत प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मात्र, या मालिकेचा दुसरा सीझन येणार का? आणि आला तर कधी येणार?, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. ,मात्र आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. एका लोकप्रिय सोशल मीडिया पेजने या संदर्भात पुष्टी केली आहे. पुढच्या सहा महिन्यात या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मालिकेचा अंत झालाच नाही!

डिम्पलच्या घरी पूजेच्या दिवशी डॉक्टर, डिम्पल आणि चंदा तिघेही गायब होतात. गावकरी डॉक्टरला शोधायला बाहेर पडतात तेव्हा त्यांना गावाबाहेर आग लागलेली दिसते. या आगीत त्यांना चंदाचा मृतदेह दिसतो, तर जवळच डॉक्टरचा चष्मा, घड्याळ आणि पेन दिसते. यावरून ते अंदाज लावतात की डॉक्टर देखील या आगीत मेला आहे. दुसरीकडे वाड्यात देखील पूर्वीप्रमाणे सगळ्या गोष्टी सुरु होता. वाड्याच्या दारावरून डॉक्टरचा बोर्ड काढलेला आहे. एका रात्री सगळे झोपतात तेव्हा डिम्पल हळूच आपली बॅग उचलून बाहेर पडते. तर दुसरीकडे एक माणूस हॉस्पिटलमध्ये शेवटची घटका मोजताना दाखवलं आहे. तो माणूस मारतो आणि डॉक्टर त्याला मृत घोषित करून निघून जातात. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून, देवीसिंग असतो. डॉक्टर बाहेर जाताच तो पुन्हा जिवंत होतो आणि मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते.

‘या’ प्रश्नांची उत्तरे मिळणार का?

मालिकेच्या शेवटला, चंदासोबत आगीत दुसरा मृतदेह कोणाचा होता? ही आग नेमकी कोणी लावली? डिम्पलने पैशांची बॅग कुठे ठेवली? डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं? डिम्पल रात्री कुठे पळून जाते? तिला देवीसिंगबद्दल माहित आहे का? देवीसिंग पुन्हा जिवंत कसा होतो? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवण्यात आले आहेत. यामुळे या मालिकेचा दुसरा सीझन येणार, आणि त्यातच प्रेक्षकांना याची उत्तर मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निर्मात्यांनी दिली हिंट!

‘आपल्या सर्वांची लाडकी मालिका “देवमाणूस “आज आपला निरोप घेते आहे. झी मराठी वाहिनीनी ही संधी आम्हास दिली त्यासाठी आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी राहू. लवकरच आणखीन काहीतरी खास घेऊन तुमच्या मनोरंजनास सज्ज असू, पण तोपर्यंत तुमचं असच प्रेम आमच्या पाठीशी राहुद्या, हीच नम्र विनंती’, असं मालिकेची निर्माती श्वेता शिंदे हिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. यातून तिने नवं काही तरी घेऊन येऊ, असा संकेत दिला आहे.

हेही वाचा :

अरुंधती आजारी तरी संजनाला लागलीय लग्नाची घाई, आता कोणाची साथ देईल अनिरुद्ध?

‘बाजिंद’ रंगात रंगणार सैराटच्या ‘लंगड्या-सल्या’ची जोडी, मोठ्यापडद्यानंतर आता छोटा पडदा गाजवणार!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें