अनंत अंबानीच्या सारखपुड्यात 10 मिनिटाच्या गाण्यासाठी मीका सिंगला मिळले इतके कोटी, ऐकून सगळेच आश्चर्यचकित

अंबानी कुटुंबातील कार्यक्रमांची देशभरात चर्चा असते. त्यांच्या कार्यक्रमांना जगभरातील दिग्गज लोकं हजेरी लावतात. यासाठी ते कोट्यवधींचा खर्च करतात.

अनंत अंबानीच्या सारखपुड्यात 10 मिनिटाच्या गाण्यासाठी मीका सिंगला मिळले इतके कोटी, ऐकून सगळेच आश्चर्यचकित
| Updated on: Apr 13, 2023 | 11:11 AM

मुंबई : बॉलीवूडच्या दिग्गज गायक मिका सिंग ( Mika Singh ) याने आपल्या गाण्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. बॉलिवूडमध्ये त्याची लोकप्रियता भरपूर आहे. त्याची फॅन फॉलोईंग देखील मोठी आहे. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा साखरपुडा नुकताच पार पडला. पण या एंगेजमेंटमध्ये मिका सिंगला किती फीस मिळाली हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

दिग्गज कलाकारांची हजेरी

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या ( Anant Ambani-Radhika merchant ) एंगेजमेंट पार्टीत मिकाने त्याच्या परफॉर्मन्ससाठी मोठी रक्कम आकारली होती. अनंत अंबानी याच्या साखरपुड्यात मान्यवरांसह चित्रपटसृष्टीतील दिग्गज ही पोहोचले होते. यामध्ये प्रसिद्ध गायक मिका सिंगलाही बोलावण्यात आले होते.

मिकाने गाण्याने केले मंत्रमुग्ध

या सोहळ्यात शाहरुख खान, गौरी खान, सलमान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, जान्हवी कपूर यांच्यासह अनेक मोठे सेलिब्रिटी आले होते. या पार्टीत मिकाने आपल्या गाण्यांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केले होते. त्याने येथे 10 मिनिटांचा परफॉर्मन्स दिला.

10 मिनिटाच्या गाण्यासाठी इतके कोटी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनंत अंबानींच्या एंगेजमेंट सेरेमनीमध्ये दहा मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी मिकाने 1.5 कोटी रुपये आकारले होते. हिशोब केला तर त्याला प्रत्येक मिनिटाला १५ लाख रुपये मिळाले. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आणि व्हाईस चेअरमन वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत अनंत अंबानीचे लग्न झाले आहे. या लग्नाची देखील देशभरात चर्चा होती.