Fact Check: नोरा फतेही खोल दरीत पडली, मृत्यूची अफवा, व्हिडिओ व्हायरल, तपासात मोठी बाब समोर

Fact Check: नोरा फतेहीच्या मृत्यूची अफवा, खोल दरीत पडलेली महिला नोरा असल्याची अफवा, तपासात मोठी बाब समोर... अभिनेत्री नोरा फतेही कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

Fact Check: नोरा फतेही खोल दरीत पडली, मृत्यूची अफवा, व्हिडिओ व्हायरल, तपासात मोठी बाब समोर
| Updated on: Feb 05, 2025 | 2:40 PM

अभिनेत्री नोरा फतेही हिच्याबद्दल एका मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीबद्दल एक अफवा सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये जोर धरत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील महिली खोल दरीवर रोप क्रॉसिंग करताना दिसत आहे. रोप क्रॉस करत असताना महिला खोल दरीत कोसळते. अशात व्हिडीओमध्ये दिसणारी महिला दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नोरा फतेही असल्याचा दावा केला जात आहे.

पण रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. रंगणारी चर्चा चर्चा पूर्णपणे खोटी आहे. एका इंस्टाग्राम युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आणि दावा केला की बॉलिवूडमधून वाईट बातमी येत आहे, नोरा फतेहीचा मृत्यू झाला आहे!

 

 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला माउंटन स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी झिप लाइन करताना दिसत आहे. अचानक झिप लाईन तुटल्याने ती खोल दरीत पडली. या व्हिडिओमध्ये महिलेचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही.

व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून नोरा फतेहीच्या चाहत्यांना लगेच समजलं की तो फेक व्हिडीओ आहे. त्यामुळे त्यांनी पोस्टवरच आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘नोराचं तर माहिती नाही, पण त्या महिलेचं निधन झालं का?’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘अफवा का पसरवायच्या…’ सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

एकीकडे नोराच्या निधनाच्या अफवा पसरत आहेत, तर दुसरीकडे अभिनेत्री सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहे. सांगायचं झालं तर, नोराचं नवीन गाणं नुकताच प्रदर्शित झालं आहे. सध्या अभिनेत्री गाण्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

नोरा फतेही हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.