AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विकी कौशलसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार ‘छावा’, पहिल्या दिवशी होणार इतकी कमाई…

Chhaava Box Office Day 1 Prediction: "हम शोर नहीं करते हैं, सीधा शिकार करते हैं।", विकी कौशलसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार 'छावा', पहिल्याच दिवशी सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर असेल बोलबाला?

विकी कौशलसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार 'छावा', पहिल्या दिवशी होणार इतकी कमाई...
| Updated on: Feb 05, 2025 | 11:48 AM
Share

Chhaava Box Office Day 1 Prediction: “हम शोर नहीं करते हैं, सीधा शिकार करते हैं।”, ‘विश्वास आपका साथ है.. तो युद्ध लगे त्योहार..’, ‘औरंग जब तू मरेगा तब यह तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी..’ असे एकापेक्षा एका डायलॉग असलेला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अत्यंत धाडसाची, साहसाची गोष्ट मांडणारा ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त ‘छावा’ सिनेमाची चर्चा रंगताना दिसत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सध्या अभिनेता विकी कौशल सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चाहत्यांमध्ये सिनेमाची क्रेझ पाहता सिनेमा बॉक्स ऑफिसव तगडी कमाई करेल… अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. सांगायचं झालं तर, ‘छावा’ सिनेमा विकीच्या करीयरच्या फार महत्त्वाचा ठरणार आहे. सिनेमा अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करेल असं देखील सांगण्यात येत आहे.

पहिल्या दिवशी किती कोटी कमाई करेल सिनेमा?

‘छावा’ सिनेमाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सध्या सुरु झालेली नाही. पण सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचा अंदाज येऊ लागला आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी सिनेमा बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करू शकतो. रिपोर्टनुसार, ‘छावा’ पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 17-19 कोटींची कमाई करू शकतो. असं झाल्यास ‘छावा’ हा विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ओपनर सिनेमा ठरणार आहे.

विकी कौशलचे 5 हायएस्ट ओपनर सिनेमे…

विकी कौशलच्या बॉलिवूड करीयरमधील 5 हायएस्ट ओपनर सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या क्रमांकावर ‘बॅड न्यूज’ आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाने भारतात पहिल्या दिवशी 8.62 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ सिनेमा आहे. सिनेमाने पहिल्या दिवशी 8.20 कोटी कमवले.

तिसऱ्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘राजी’ सिनेमाने पहिल्या दिवशी 7.53 कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होती. चौथ्या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘सॅम बहादूर’ सिनेमाने पहिल्या दिवशी 5.75 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. तर ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाने 5.59 कोटी रुपये पहिल्या दिवशी कमवले.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.