घराचे रिनोव्हेशन करताना मोठा अपघात, प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू

एका प्रसिद्ध अभिनेत्याने वयाच्या 55व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. घरात सुरु असलेल्या रिनोवेशनच्या कामाच्या वेळी मोठा अपघात झाला आणि या अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे.

घराचे रिनोव्हेशन करताना मोठा अपघात, प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू
tony germano
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 30, 2025 | 5:00 PM

प्रसिद्ध ब्राझीलियन अभिनेता टोनी जर्मेनो आता या जगात नाही. निकी, रिकी, डिकी आणि डॉन सारख्या निकेलोडियन शोमधील कामासाठी ते प्रसिद्ध होते. टोनी जर्मेनोचा वयाच्या 55 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. घराचे रिनोव्हेशन करताना मोठा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले, ज्यात त्यांचा जीव गेला. टोनी यांनी ब्राझीलच्या साओ पाव्लो येथील स्वतःच्या घरात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

टोनी जर्मेनो यांच्याबद्दल

टोनी जर्मेनो हे ब्राझीलमधील एक प्रसिद्ध व्हॉइस-ओव्हर आर्टिस्ट, अभिनेते आणि कॉमेडियन होते. त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रसिद्ध प्रोजेक्ट्समध्ये काम केले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरींमध्ये अस नुप्सियास डे ड्रॅकुला (२०१८), लेबिरिंथ ऑफ लॉस्ट बॉयज (२०२५) आणि एन अनफॉरगेटेबल ईयर: ऑटम (२०२३) यांचा समावेश आहे. त्यांनी एलेना ऑफ अव्हलोर आणि द मॅपेट्स सारख्या प्रोजेक्ट्समध्येही आपली आवाज दिली आहे.

55व्या वर्षी टोनी जर्मेनो यांचा मृत्यू

स्थानिक माध्यम फोल्हा डे साओ पाव्लो आणि ओ एस्टाडो डे साओ पाव्लोनुसार टोनी जर्मेनो साओ पाव्लो येथील स्वतःच्या घरी रिनोव्हेशन करत होते. दरम्यान ते पडले आणि गंभीर जखमी झाले. अपघाताच्या वेळी ते ब्राझीलमधील आई-वडिलांच्या घरी राहत होते, जिथे रिनोव्हेशन काम चालू असताना ते शिडीवरुन खाली पडले. अभिनेत्याच्या एका प्रतिनिधीने सांगितले की, “अभिनेता आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट टोनी जर्मेनो यांच्या निधनाची दु:खद बातमी आम्हाला कळवावी लागतेय. टोनी घरात पडले, ज्यात त्यांना गंभीर जखमाही झाल्या, त्या जखमांमधून ते सावरू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला.”

मिगुएल फलाबेला यांनी दिली श्रद्धांजली

ब्राझीलियन अभिनेता मिगुएल फलाबेला यांनी टोनी जर्मेनो यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांची एक फोटो शेअर करत अभिनेत्याला श्रद्धांजली देत लिहिले, “टोनी जर्मेनोने जगाचा निरोप घेतला आहे. एक दोषमुक्त व्यावसायिक, एक प्रिय मित्र, एक प्रतिभावान अभिनेता मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. एनी आणि मॅन ऑफ ला मांचा, इतर काही प्रोजेक्टमध्ये आम्ही एकत्र काम केले. प्रिय मित्रा, तुम्ही नेहमी आठवणीत राहाल.”