AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्र्यासोबत लग्न, वयाच्या 36 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण

Love Life | झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेत्रीच्या प्रेमाला कुटुंबियांचा विरोध, कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्र्यासोबत लग्न, कोण आहे 'ही' अभित्री? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्र्यासोबत लग्न, वयाच्या 36 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
| Updated on: Feb 20, 2024 | 2:07 PM
Share

मुंबई | 20 फेब्रुवारी 2024 : झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी राजकारणी व्यक्तीसोबत लग्न केलं आणि आज सुखी संसार करत आहेत. पण एक अभिनेत्री अशी आहे जिने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून कन्नड अभिनेत्री आणि निर्माती राधिका कुमारस्वामी. राधिका हिने 2006 मध्ये मोठा निर्यण घेतला. ज्यामुले सिनेविश्व आणि राजकारण मोठी खळबळ माजली. सध्या सर्वत्र राधिका हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्रीच्या निर्णयानंतर राधिका हिचं खासगी आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. पण अभिनेत्रीच्या प्रोफेशनल आयुष्याला कायमचा ब्रेक लागला. त्याचवेळी जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या वैयक्तिक जीवनात आणि राजकीय कारकिर्दीत खळबळ उडाली होती. लोकांना कुमारस्वामी यांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा त्यांच्या वैयक्तिक जीवनात अधिक रस निर्माण झाला.

राधिका हिने 30 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं. पण राधिका हिला प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली नाही. अभिनेत्रीचे सिनेमे सतत फॉप असल्यामुळे राधिका हिने सिनेमा निर्मितीकडे स्वतःचा मोर्चा वळवला. पण जेव्हा राधिका हिच्या खासगी आयुष्याची माहिती समोर आली तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसला.

खुद्द राधिका हिने 2010 मध्ये माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत 2006 मध्ये लग्न केल्याची घोषणा केली. माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि राधिका यांना एक मुलगी देखील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लग्नाच्या वेळी माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी 47 वर्षांचे होते. तर राधिका त्यांच्यापेक्षा 27 वर्ष लहान होती.

राधिका हिच्यासोबत माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचं दुसरं लग्न होतं. लग्नासाठी राधिका हिच्या वडिलांचा विरोध होता. पण राधिका हिने वडिलांच्या विरोधात जाऊन माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत लग्न केलं. राधिका आता पती आणि मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत. दोघांनी लग्न गुपित ठेवलं. होतं. पण जेव्हा अभिनेत्रीच्या वडिलांना मुलीच्या लग्नाबद्दल कळलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.

माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर राधिका रॉयल आयुष्य गजत आहे. अभिनेत्रीच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, राधिका 124 कोटी रुपयांची मालकीण आहे तर, एचडी कुमारस्वामी यांच्याकडे 44 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.