Death | ‘या’ प्रसिद्ध गायकाने घेतला जगाचा निरोप, खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
नुकताच एका प्रसिद्ध गायकाने जगाचा निरोप घेतला आहे. गायकाच्या निधनानंतर चाहत्यांना देखील मोठा झटका बसला आहे. कुटुंबावर देखील शोककळा पसरलीये. गायकाच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांनी आता रूग्णालयाकडे धाव घेतली आहे.

मुंबई : संगीत क्षेत्रातून एक दु:खद बातमी पुढे येतंय. प्रसिद्ध पंजाबी गायक सुरिंदर शिंदा (Surinder Shinda) यांचे निधन झाले आहे. सुरिंदर शिंदा यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. सुरिंदर शिंदा यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट गाणी गायली आहेत. सुरिंदर शिंदा यांचा चाहता वर्ग हा अत्यंत मोठा आहे. सुरिंदर शिंदा यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून लुधियानाच्या डीएमसी रूग्णालयात (DMC Hospital) उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतलाय. सुरिंदर शिंदा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय.
रिपोर्टनुसार काही दिवसांपूर्वीच सुरिंदर शिंदा यांचे एक ऑपरेशन झाले होते. त्या ऑपरेशननंतर त्यांच्या शरीरामध्ये इंफेक्शन वाढले होते आणि त्यामुळेच त्यांना डीएमसी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तरीही त्यांच्या आरोग्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही आणि बुधवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
सुरिंदर शिंदा यांच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांनी थेट डीएमसी रूग्णालयाकडे धाव घेतली. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुरिंदर शिंदा यांना श्रद्धांजली देखील वाहिली. रिपोर्टनुसार, सुरिंदर शिंदा यांच्या मुलाने निवेदनात सांगितले की, 11 जुलैला अचानक प्रकृती बिघडल्याने सुरिंदर शिंदा यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.
सुरिंदर शिंदा यांना रूग्णालयात दाखल करण्याच्या अगोदर त्यांना काही दिवसांपासून पोटदुखीची समस्या होती. यामुळेच त्यांना शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. मात्र, त्यानंतर त्यांच्या शरीरातील इंफेक्शन हे सतत वाढत होते. यामुळेच त्यांना डीएमसी रुग्णालयात हलवण्यात आले.
सुरिंदर शिंदा यांचे शरीर म्हणावा तसा उपचारा प्रतिसाद देत नव्हते. शेवटी बुधवारी त्यांची प्राणज्योत मावळली. 64 व्या वर्षी सुरिंदर शिंदा यांनी शेवटचा श्वास घेतला. सुरिंदर शिंदा यांनी जट जियोना मोर, ट्रक बिल्लियां आणि कहर सिंह दी मौत असे गाणे गायले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सुरिंदर शिंदा यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले.
