AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट निश्चित? अभिषेकला बघताच ऐश्वर्याची अशी अवस्था, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, चाहते हैराण

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल सतत काही चर्चा सुरू आहेत. या चर्चांमुळे चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नसल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर यांच्या घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जातंय.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट निश्चित? अभिषेकला बघताच ऐश्वर्याची अशी अवस्था, 'तो' व्हिडीओ व्हायरल, चाहते हैराण
| Updated on: Dec 18, 2023 | 5:13 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट लवकरच होणार असल्याचे सांगितले जातंय. फक्त हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याची चर्चा आहे. ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चन याचे घर सोडून आपल्या आईसोबत राहत असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. सतत घटस्फोटाची चर्चा सुरू असताना बच्चन कुटुंबियांपैकी कोणीच यावर काही भाष्य केले नाहीये. यामुळे खरोखरच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार का यावर चर्चा सुरू आहे.

नुकताच सोशल मीडियावर ऐश्वर्या राय हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. ऐश्वर्या राय हिचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी थेट म्हटले की, नक्कीच आता ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार आहे.

नुकताच एका कार्यक्रमात ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे वेगवेगळ्या गाड्यांमध्ये पोहचले. इतकेच नाही तर यावेळी ऐश्वर्या राय हिच्यासोबत मुलगी आराध्या ही देखील दिसली. अभिषेक बच्चन याला पाहून ऐश्वर्या राय ही हसताना दिसली. मात्र, तिच्या चेहऱ्यावर दु:ख देखील दिसत होते. दुरून अभिषेक बच्चन याला बघताना ऐश्वर्या राय दिसली.

हा व्हिडीओ पाहून आता अनेक चर्चा या रंगताना दिसत आहेत. एकाने या व्हिडीओवर कमेंट करून म्हटले की, अरे एकाच घरात राहतात तर वेगळ्या गाड्या कशासाठी? ऐश्वर्या राय हिचा अभिषेक बच्चन याला पाहून झालेला चेहरा बरेच काही सांगून जात आहे, नक्कीच या दोघांच्या नात्यामध्ये सर्वकाही व्यवस्थित नाहीये.

अजून एकाने लिहिले की, दोघेही एकमेकांकडे ज्या पद्धतीने बघत आहेत, त्यावरून हे स्पष्ट आहे की यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टी या व्यवस्थित नक्कीच दिसत नाहीयेत. मात्र, घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी अजूनही काहीच भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या राय हिचे सासू जया बच्चन आणि ननंद श्वेता बच्चन यांच्यासोबत अजिबातच चांगलेच रिलेशन नसल्याचे सांगितले जाते.

Follow Us
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? NCP नेत्याचा...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का? बड्या NCP नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा