‘निर्लज्ज आहेस तू’; रणबीर-आलियासाठी केआरकेनं दिलेल्या शुभेच्छा पाहून भडकले नेटकरी

आई झालेल्या आलियाला KRK च्या खोचक शुभेच्छा; भडकलेले नेटकरी म्हणाले..

निर्लज्ज आहेस तू; रणबीर-आलियासाठी केआरकेनं दिलेल्या शुभेच्छा पाहून भडकले नेटकरी
रणबीर-आलियासाठी केआरकेनं दिलेल्या शुभेच्छा पाहून भडकले नेटकरी
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 06, 2022 | 7:50 PM

मुंबई- अभिनेत्री आलिया भट्टने मुलीला जन्म दिल्याची ‘गुड न्यूज’ कळताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीही सोशल मीडियाद्वारे रणबीर कपूर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या. अशातच स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमाल आर. खान याच्या ट्विटने अनेकांचं लक्ष वेधलं. केआरके नेहमीच त्याच्या वादग्रस्त ट्विट्ससाठी ओळखला जातो. रणबीर-आलियाला शुभेच्छा देतानाच त्याने खोचक टिप्पणीही केली. त्यामुळे भडकलेल्या नेटकऱ्यांनी केआरकेला सुनावलं.

सात महिन्यात एका सुंदर मुलीचे पालक झाल्याबद्दल रणबीर आलियाला शुभेच्छा, असं ट्विट केआरकेनं केलं. रणबीर आलियाने या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं होतं. त्यानंतर जून महिन्यात आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. म्हणूनच सात महिन्यात पालक झाल्याचा उल्लेख केआरकेनं त्याच्या ट्विटमध्ये केला. मात्र नेटकऱ्यांना हे अजिबात आवडलं नाही.

‘तू निर्लज्ज आहेस’ असं एका नेटकऱ्याने कमेंट्समध्ये लिहिलं. तर ‘प्रत्येक गोष्टीत तुला उलटसुलट बोलायचंच असतं का’, असा सवाल दुसऱ्याने केला. ‘नव्या प्रवासाची सुरुवात आहे. तू काही चांगलं बोलू शकत नसला तर तोंड बंद तरी ठेव’, असा सल्ला एका युजरने केआरकेला दिला.

आलियाने मुलगी झाल्याची गुड न्यूज सोशल मीडियावर पोस्ट लिहित देताच त्यावर अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, मौनी रॉय, सोनम कपूर, कपिल शर्मा, श्वेता बच्चन यांसारख्या सेलिब्रिटींनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या. यामध्ये कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांचाही समावेश होता.