AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Animal चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला, या चित्रपट इतके बोल्ड आणि इंटीमेट सीन की प्रेक्षकांना मोजता येईना

Animal चित्रपटापेक्षा या चित्रपटात आहेत प्रचंड बोल्ड आणि इंटीमेट सीन. इतके की प्रेक्षक म्हणाले मोजू देखील शकणार नाही. कोणता आहे चित्रपट?

Animal चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला, या चित्रपट इतके बोल्ड आणि इंटीमेट सीन की प्रेक्षकांना मोजता येईना
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 13, 2026 | 1:40 PM
Share

 O Romeo:  बॉलिवूड अभिनेता अभिनेता शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांचा बहुचर्चित चित्रपट ‘ओ रोमियो’ अखेर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. विशेषतः अ‍ॅक्शन, रोमान्स आणि इंटिमेट सीनमुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रेक्षकांच्या मते, या चित्रपटात दमदार अ‍ॅक्शन सीन्ससोबत शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्यातील रोमँटिक आणि इंटिमेट सीनही मोठ्या प्रमाणात दाखवण्यात आले आहेत. काही प्रेक्षकांनी तर विनोदाने असे म्हटले की, चित्रपट पाहताना किसिंग सीन मोजणेच अशक्य झाले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका युजरने लिहिले की, ‘या चित्रपटात किती किसिंग सीन आणि किती वेळा शिवीगाळ वापरली गेली आहे हे मी मोजूच शकत नाही. कुणी पाहिलं असेल तर मला नक्की सांगा.’ या कमेंटमुळे चित्रपटातील बोल्ड सीनमुळे चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले आहे. त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी ते ओळखले जातात. एका प्रेक्षकाने इंटरव्हलदरम्यान प्रतिक्रिया देताना लिहिले की, ‘विशाल भारद्वाज यांनी प्रेम आणि हिंसा यांचा मिलाफ करून जो धोका पत्करला आहे, तो कौतुकास्पद आहे. चित्रपटात कविता आणि कलेचा सुंदर संगम पाहायला मिळतो. काही ठिकाणी कथानकाची गती मंदावते पण हा चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल.’

शाहिद-तृप्तीची केमिस्ट्री चर्चेत

शाहिद कपूरने आपल्या अभिनयातून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. तर तृप्ती डिमरी हिच्यासोबत त्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जबरदस्त वाटत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात दोघांमधील प्रेमकथा प्रभावीपणे उलगडताना दिसते. त्यामुळे आता दुसऱ्या भागात या नात्याचा पुढे काय परिणाम होतो याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

एकंदरीत, ‘ओ रोमियो’ने रिलीज होताच सोशल मीडियावर चर्चा रंगवली आहे. अ‍ॅक्शन, रोमान्स आणि बोल्ड सीन्स यांचा संगम या चित्रपटाला वेगळेपण देतो आहे. शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांची जोडी प्रेक्षकांना भावत असून त्यांच्या रोमान्सच्या जोरावर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवेल अशी चर्चा सध्या रंगत आहे.

Follow Us
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....