
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) ही नेहमीच चर्चेत असते. विशेष म्हणजे मौनी रॉय हिने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. इतकेच नाही तर मौनी रॉय हिने आपल्या करिअरची सुरूवात एकता कपूर (Ekta Kapoor) हिची मालिका नागिनमधून केलीये. नागिन मालिकेत काम करण्यास सुरूवात केल्यापासून मौनी रॉय हिचे नशिबच बदलून गेले. मालिकेनंतर मौनी रॉय हिला अनेक चित्रपटाच्या थेट आॅफर आल्या. विशेष म्हणजे आज मौनी रॉय हिचा मोठा चाहता वर्ग आहे. मौनी रॉय ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) ती कायमच शेअर करते.
काही दिवसांपूर्वीच मौनी रॉय ही दिशा पटानी हिच्यासोबत विदेशात धमाल करताना दिसली होती. सतत दिशा आणि मौनी रॉय या सोशल मीडियावर विदेशातील फोटो शेअर करताना दिसल्या होत्या. दिशा पटानी आणि मौनी रॉय या खूप चांगल्या मैत्रिनी आहेत. मौनी रॉय हिने यावेळी बिकिनी लूकमधील काही खास फोटो शेअर केले होते. यामुळे इंटरनेटाचा पारा चांगला वाटला होता.
नुकताच आता मौनी रॉय हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. मौनी रॉय हिची ही पोस्ट पाहून तिचे चाहते हे चिंतेमध्ये आल्याचे बघायला मिळत आहे. कारण या पोस्टमध्ये मौनी रॉय हिने स्पष्ट केले की, ती तब्बल 9 दिवस हाॅस्पीटलमध्ये उपचार घेत होती. या पोस्टसोबतच मौनी रॉय हिने काही खास फोटो देखील शेअर केले आहेत.
या पोस्टमध्ये मौनी रॉय हिने लिहिले की, या नऊ दिवसांमध्ये माझी काळजी घेतल्याचे सर्वांचे मी धन्यवाद मानते. पतीबद्दल लिहिताना मौनी रॉय हिने लिहिले की, हाॅस्पीटलमध्ये दाखल झाल्यापासून प्रत्येक मिनिटे माझी काळजी घेतल्याबद्दल मी सूरज नांबियार याचे आभार मानते असेही मौनी रॉय हिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.
मौनी रॉय हिने पुढे लिहिले की, नऊ दिवस हाॅस्पीटलमध्ये राहणे माझ्यासाठी खूप जास्त अशांत होते. यावेळी अनेकांनी माझी काळजी घेतली. आता मी खुश आहे, कारण आता मी घरी परत आलीये. आता हळूहळू चांगली होत आहे. मौनी रॉय ही पतीसोबत दुबईला राहते. नऊ दिवस तब्येत खराब असल्याने हाॅस्पीटलमध्ये राहण्याची वेळ ही मौनी रॉय हिच्यावर आली आहे.