
मुंबई : झगमगत्या विश्वात आतापर्यंत अनेक अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. आता देखील एका प्रसिद्ध फॅशन डिझायनरने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद याठिकाणी राहणाऱ्या फॅशन डिझायनरने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. या फॅशन डिझायनरचं नाव मुस्कान नारंग असं आहे. २८ एप्रिल रोजी मुस्कान हिने टोकाचं पाऊल उचललं. तिच्या निधनामुळे कुटुंबासह अनेकांना मोठा धक्का बसला आहे. मुस्कान मुंबईहून गावी आई-वडिलांकडे गेली होती. गावी मुरादाबाद याठिकाणी मुस्कानने स्वतःला संपवलं. तिच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. स्वतःला संपवण्यापू्र्वी मुस्कान हिने शेवटचा व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिने स्वतःला संपवत असल्याचं म्हटलं आहे. सध्या सर्वत्र मुस्कान हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शेवटच्या व्हिडीओमध्ये मुस्कान म्हणते, ‘आज माझा हा शेवटचा व्हिडीओ असणार आहे. कदाचित या व्हिडीओनंतर तुम्ही मला पाहू शकत नाही. लोक मला म्हणतात मी माझ्या आयुष्यातील अडचणी शेअर करायला हव्यात, पण शेअर केल्यानंतर देखील काहीही होत नाही. मी सर्वांना समजावण्याचा प्रयत्न केला. बहीण, आई-बाबा, मीत्र सर्वांना समजावण्याचा प्रयत्न केला… तर उलट तेच माझी समज घालू लागले.’
पुढे मुस्कान म्हणाली, ‘मी आज जे काही करत आहे, ते माझ्या मर्जीने करत आहे. यामध्ये कोणाचाही समावेश नाही. त्यामुळे कृपया कोणावर कोणतेही आरोप करु नका. लोक म्हणतात माझ्यामध्ये सेल्फ-कॉन्फिडेन्स नाही… तर असं काहीही नाही माझ्याकडे सेल्फ-कॉन्फिडेन्स आहे.’ सध्या मुस्कानची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुस्कार गुरुवारी कुटुंबासोबत जेवली, त्यानंतर स्वतःच्या खोलीत गेली. शुक्रवारी मुस्कानने दरवाजा न उघडल्यानंतर कुटुंबीयांनी दरवाजा तोडला. तेव्हा मुस्कान हिने स्वतःला संपवल्याचं कुटुंबाला दिसलं. मुस्कानच्या कुटुंबात आईबाबा, तीन बहिणी व एक भाई आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.