जॅकलीन फर्नांडिसच्या इमारतीला आग; वर्षभरापूर्वीच अभिनेत्रीने घेतला होता फ्लॅट

पाली हिल परिसरातील 17 मजली इमारतीला बुधवारी रात्री आग लागली. याच इमारतीत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचाही फ्लॅट आहे. गेल्याच वर्षी तिने हा फ्लॅट खरेदी केला होता. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जॅकलीन फर्नांडिसच्या इमारतीला आग; वर्षभरापूर्वीच अभिनेत्रीने घेतला होता फ्लॅट
जॅकलीन फर्नांडिसच्या इमारतीला आगImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 10:59 AM

मुंबई : 7 मार्च 2024 | मुंबईतल्या वांद्रे पश्चिममधील पाली हिल परिसरात असलेल्या नवरोज हिल सोसायटीला बुधवारी रात्री आग लागली. याच इमारतीत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससुद्धा राहते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या तेराव्या मजल्यातील एका किचनमध्ये ही आग लागली होती. जॅकलीनचा या इमारतीत 5 बीएचके अपार्टमेंट आहे. रात्री 8 वाजताच्या सुमारास नरगिस दत्त रोडवरील या इमारतीला आग लागली होती. तेराव्या मजल्यावरील ही आग चौदाव्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. जॅकलीन या इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर राहते.

जॅकलीनने गेल्याच वर्षी वांद्रे परिसरातील या इमारतीत आलिशान घर खरेदी केलं होतं. या घराचा एक व्हिडीओ जुलै महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या इमारतील विविध रेंजमधील हाऊसिंग पर्याय उपलब्ध आहेत. त्यात सूट्स, पेंटहाऊस, स्काय विला आणि मॅन्शन यांचा समावेश आहे. पाली हिल परिसरात अनेक सेलिब्रिटींची घरं आहेत. यामध्ये सैफ अली खान, करीना कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खानसुद्धा या परिसराच्या काही मिनिटांच्या अंतरावर राहतात. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणसुद्धा या परिसरात शिफ्ट होणार असल्याची माहिती आहे. समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या त्यांच्या घराचं बांधकाम सध्या सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

जॅकलीन फर्नांडिसबद्दल बोलायचं झाल्यास, ती सध्या हॉलिवूड पदार्पणाची जोरदार तयारी करत आहे. या चित्रपटात ती जीन-क्लाउड वॅन डॅमसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सोशल मीडियावर तिने त्याच्यासोबतचा फोटोसुद्धा पोस्ट केला होता. यासोबतच तिने इटलीत एका प्रोजेक्टचं शूटिंग पूर्ण केलंय.

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातही जॅकलीनचं नाव समोर आलंय. याप्रकरणी तिची चौकशी सुरू आहे. आरोपी सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला अत्यंत महागड्या भेटवस्तू दिल्याचा आरोप आहे. मात्र जॅकलीनने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. सुकेशने मला या प्रकरणात गोवलं, असं म्हणत तिने आरोप मागे घेण्याची विनंती दिल्ली हायकोर्टात केली.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.