लग्नात नाचताना धर्मेंद्र यांना दुखापत; दोन आठवड्यांपासून आजारी, आता कशी आहे प्रकृती?

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे नुकतेच उदयपूरला एका लग्नसोहळ्यासाठी गेले होते. या लग्नात नाचताना त्यांच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून ते आजारी असल्याचं कळतंय. आता त्यांच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स समोर आले आहेत.

लग्नात नाचताना धर्मेंद्र यांना दुखापत; दोन आठवड्यांपासून आजारी, आता कशी आहे प्रकृती?
DharmendraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 9:24 AM

मुंबई : 7 मार्च 2024 | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे वयाच्या 88 व्या वर्षीही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. इतकंच नव्हे तर सोशल मीडियाद्वारेही ते असंख्य चाहत्यांच्या संपर्कात असतात. नुकताच त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता. त्यामध्ये ते खूपच कमजोर दिसत होते, म्हणून चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. मात्र काही तासांतच त्यांनी तो फोटो डिलिट केला. आता त्यांच्या प्रकृतीविषयी नवीन अपडेट समोर आली आहे. धर्मेंद्र यांना थोडी दुखापत झाली होती. गेल्या दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, धर्मेंद्र यांना दुखापत झाली होती. लग्नसोहळ्यात नाचताना त्यांच्या पाठीला आणि पायाला लागलं होतं. मात्र आता ते ठीक आहेत. गेल्या शुक्रवारी धर्मेंद्र यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होतं, ‘मध्यरात्र झाली आहे, झोप येत नाहीये. मधेच भूक लागते. मक्खनसोबत शिळ्या चपातीला खूप चांगली चव लागते.’ या फोटोमध्येही धर्मेंद्र यांची प्रकृती ठीक नसल्याचं दिसून आलं होतं. या फोटोवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. ‘सर, तुमच्या पायाला काय झालंय?’, असा प्रश्नही अनेकांनी विचारला होता. मात्र धर्मेंद्र यांनी काही वेळानंतर तो फोटो डिलिट केला.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र हे गेल्या दोन आठवड्यांपासून आजारी आहेत. त्यांचं आजारपण फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं. ते नुकतेच उदयपूरला एका लग्नसोहळ्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत मुलगा सनी आणि बॉबी देओलसुद्धा होते. याच लग्नसोहळ्यात नाचताना त्यांच्या पाठीला आणि पायाला दुखापत झाली. यानंतर त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. थकवा आणि वृद्धापकाळामुळे दुखापतीचा त्यांच्या स्वास्थ्यावर आणखी परिणाम झाला.

जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते आता ठीक आहेत. सध्या ते पूर्णपणे आरोग्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. धर्मेंद्र यांच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, ते नुकतेच ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात झळकले होते. यामध्ये शाहिद कपूर आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याआधी धर्मेंद्र यांनी करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातही काम केलं होतं.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.