AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s Day 2024: जागतिक महिला दिन 8 मार्च रोजीच का साजरा केला जातो? जाणून घ्या कारण..

दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. मात्र याच दिवशी 'महिला दिन' का साजरा केला जातो, हे फार क्वचित लोकांना माहित असेल. यामागचा इतिहास काय आणि हाच दिवस का निवडला गेला, ते जाणून घेऊयात..

Women's Day 2024: जागतिक महिला दिन 8 मार्च रोजीच का साजरा केला जातो? जाणून घ्या कारण..
'महिला दिन' साजरा करण्यासाठी 8 मार्च ही तारीखच का निवडली? Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 06, 2024 | 1:08 PM
Share

मुंबई : 6 मार्च 2024 | जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस. दरवर्षी 8 मार्च रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने 8 मार्च 1975 रोजी महिला दिन साजरा करण्याची सुरुवात केली होती. हा दिवस खास महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. यादिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. राजकारणापासून विज्ञान, कला, संस्कृती आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. मात्र 8 मार्च हीच तारीख का निवडली, यामागचं कारण फार क्वचित लोकांना माहीत असेल.

महिला दिन साजरा करण्यासाठी 8 मार्च ही तारीख निवडण्यामागे खास कारण आहे. आज महिला स्वत:ला चांगल्या प्रकारे व्यक्त करु शकतात. मात्र पहिलं असं नव्हतं. पूर्वीच्या महिलांना ना शिक्षण, ना नोकरी आणि ना मतदान करण्याचा अधिकार होता. 1908 मध्ये 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कमध्ये रस्त्यावर उतरत एक मोर्चा काढला होता. मतदानाचा अधिकार, कमी तासांची नोकरी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळावी या तीन प्रमुख गोष्टींच्या मागण्यांसह हा मोर्चा काढण्यात आला होता. हा दिवस होता 8 मार्चचा. तर रशियातील महिलांनी ‘महिला दिवस’ साजरा करत पहिल्या विश्वयुद्धाचा विरोध केला होता. ‘ब्रेड अँड पीस’साठी रशियन महिलांनी 1917 मध्ये आंदोलन केलं होतं. तर युरोपमध्येही महिलांनी 8 मार्च रोजी शांतीचं समर्थन करण्यासाठी रॅली काढली होती. याच कारणांमुळे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. नंतर 1975 मध्ये संयुक्त राष्ट्रने या दिवसाला मान्यता दिली.

1909 मध्ये अमेरिकेत सोशलिस्ट पार्टीने एक घोषणा केली आणि युनायटेड स्टेटमध्ये पहिला जागतिक महिला दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला होता. यानंतर सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. तसंच 19 मार्चला पहिल्यांदा ऑस्ट्रिया डेन्मार्क आणि स्वित्झरलँडमध्येही जागतिक महिला दिवस साजर केला गेला. दोन वर्षानंतर 1913 मध्ये जागतिक महिला दिनाची तारीख बदलून 8 मार्च करण्यात आली आणि तेव्हापासून आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक महिला दिन सन्मान देण्यासाठी महिला सशक्तीकरण आणि मुला-मुलींमधील भेदभाव दूर करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. दरम्यान 2017 मध्ये एका सर्व्हेनुसार एक धक्कादायक अशी गोष्ट समोर आली आहे. सर्व्हेच्या माहितीनुसार महिला-पुरुषांमधील असमानता संपण्यासाठी अजून 100 वर्ष लागण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतात मुंबई इथं पहिला महिला दिन हा 8 मार्च 1943 रोजी साजरा झाला.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.