करण जोहरसमोर वडील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनबद्दल काय म्हणाले बॉबी-सनी देओल?

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट जेव्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा रणवीर आणि आलियाच्या केमिस्ट्रीपेक्षा जास्त ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची चर्चा झाली. आता 'कॉफी विथ करण 8'मध्ये सनी आणि बॉबी देओल त्यावर व्यक्त झाले.

करण जोहरसमोर वडील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनबद्दल काय म्हणाले बॉबी-सनी देओल?
सनी-बॉबी देओलने वडील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर दिली प्रतिक्रियाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 30, 2023 | 2:56 PM

मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 | निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’चा आठवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी हजेरी लावली होती. आता दुसऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये बॉलिवूडमधील लोकप्रिय भावंडं म्हणजेच सनी देओल आणि बॉबी देओल हे पाहुणे म्हणून आल्याचं दिसत आहे. सनी आणि बॉबी देओलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत देओल कुटुंबाची वेगळीच लोकप्रियता आहे. त्यामुळे या दुसऱ्या एपिसोडची प्रेक्षकांमध्ये फारच उत्सुकता आहे.

या एपिसोडमध्ये सनी आणि बॉबी देओल हे त्यांच्या करिअर आणि आगामी चित्रपटांबद्दल मोकळेपणे गप्पा मारतात. यादरम्यान बॉबी देओल म्हणतो, “सलमान भाईने मला एकदा म्हटलं होतं की, हे बघ जेव्हा माझं करिअर ठीक चालत नव्हतं, तेव्हा मी तुझ्या भावाच्या पाठीवर चढलो आणि पुढे निघून आलो. हे ऐकून मी म्हणालो, मामू मग मला तुझ्या पाठीवर चढू दे ना.” देओल भावंडांसोबत करण जोहरच्या खुमासदार गप्पा रंगणार आहेत, हे या प्रोमोतून स्पष्ट जाणवतंय.

हे सुद्धा वाचा

पहा प्रोमो

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

या प्रोमोमध्ये देओल भावंडांनी वडील धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवरही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात त्यांचा आणि अभिनेत्री शबाना आझमी यांचा किसिंग सीन होता. त्याची बरीच चर्चा झाली होती. त्यावर बॉबी म्हणतो, “तुझा चित्रपट आम्हाला खूप आवडला. आम्ही मस्करी करत होतो की पापा किस पण करत होते. पण कोणी बोलो अथवा न बोलो, ते खूप क्यूट आहेत.” यानंतर करण जेव्हा सनी देओलची प्रतिक्रिया विचारतो, तेव्हा तो म्हणतो, “डॅड त्यांना आवडीची कोणतीही गोष्ट करू शकतात आणि त्यातून ते आरामात निसटूनही जातात.”

‘कॉफी विथ करण 8’च्या या एपिसोडमध्ये करण आणि सनी देओल हे बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही चर्चा करतात. हे आकडे खोटे असतात की खरे, त्यावर सनी देओल काय म्हणतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संपूर्ण प्रोमोमध्ये देओल भावंडं हसताना आणि करणशी खुलून गप्पा मारताना दिसत आहेत. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी एपिसोडविषयी उत्सुकता व्यक्त केली, तर काहींनी देओल भावंडांच्या उपस्थितीवरून सवाल केला आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी संपली, उद्या काय घडणार?.
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले
रोहित पवार यांचं सोशल मीडिया अकाऊंट बंद? भाजपवर गंभीर आरोप करत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अपशब्द, नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?.
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, परीक्षा पास झाल्यावर मुलाखती आधी....
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
राणे, त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?.
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची
ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम,उपचारांची गरज; जिव्हारी लागणारी टीका कुणाची.
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?
नालायक लोकांना तो शब्द वापरला पाहिजे, ठाकरे अन राऊतांवर कुणाचा पलटवार?.
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?
छगन भुजबळ पदाला चिकटून बसणारे, गरळ ओकणारे मंत्री, कुणी केली जहरी टीका?.
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर
नाशकात गारपीट आणि अवकाळीनं सारं काही हिरावलं, बळीराजाला अश्रू अनावर.
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल
आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडल असतं, राऊतांनी कुणाला फटकारल.