IPL 2024, PBKS vs CSK : महेंद्रसिंह धोनीच्या टी20 करिअरमध्ये पहिल्यांदाच असं काही घडलं, पाहा व्हिडीओ

आयपीएल 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना पार पडला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने 28 धावांनी जिंकला. या सामन्यात महेंद्रसिंह धोनी शेवटचे काही चेंडू खेळण्यासाठी मैदानात उतरला. तो काही खास करेल असं वाटत होतं. मात्र नको तो विक्रम करून बसला.

IPL 2024, PBKS vs CSK : महेंद्रसिंह धोनीच्या टी20 करिअरमध्ये पहिल्यांदाच असं काही घडलं, पाहा व्हिडीओ
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 7:26 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 53व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून सुपर किंग्सला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिले. पंजाब किंग्सने या सामन्यात आपल्या प्लेइंग 11मध्ये बदल केला नाही. मात्र चेन्नई सुपर किंग्स दोन बदलांसह मैदानात उतरली होती. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची नाजूक स्थिती असताना शेवटचे काही चेंडू खेळण्यासाठी महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरला. 19 वं षटक हर्षल पटेल टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हर्षल पटेलने शार्दुल ठाकुरला तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर नेहमीप्रमाणे एका हिरोप्रमाणे महेंद्रसिंह धोनीने एन्ट्री मारली. शेवटचे 8 चेंडू असल्याने तुफान फटकेबाजी पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचा हिरमोड झाला. महेंद्रसिंह धोनी एका चेंडूचा सामना करून तंबूत परतला. हर्षल पटेलने त्याचा त्रिफळा उडवला.

महेंद्रसिंह धोनी आपल्या टी20 करिअरमध्ये पहिल्यांदा ननव्या स्थानावर बॅटिंगसाठी उतरला होता. आयपीएल 2024 स्पर्धेत पहिल्यांदाच कोणत्या गोलंदाजाने महेंद्रसिंह धोनी क्लिन बोल्ड केलं. यापूर्वी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला होता. आयपीएल 2024 स्पर्धेत खेळलेल्या 11 सामन्यात महेंद्रसिंह धोनीने 110 धावा केल्या आहेत. यात 37 धावा ही सर्वोत्तम खेळी ठरली. धोनीने 110 च्या सरासरीने आणि 229.17 च्या स्ट्राईक रेटने या धाव केल्या. धोनीने आयपीएलमध्ये एकूण 5522 धावा केल्या आहेत.

महेंद्रसिंह धोनीला बाद केल्यानंतर हर्षल पटेलने आनंद व्यक्त केला नाही. धोनीला सन्मान देत त्याने ही कृती केली. हर्षल पटेलने धोनीला तिसऱ्यांदा बाद केलंआहे. धोनीने आयपीएलमध्ये हर्षल पटेलच्या 33 चेंडूंचा सामना केला आहे. यात 25 धावा केल्या आहेत. तसेच त्याची पटेलविरुद्ध सरासरी 8.33 आहे. तर स्ट्राईक रेट हा 75.75 इतक आहे. यात त्याने फक्त दोन चौकार मारले आहेत आणि 16 चेंडू निर्धाव गेले आहेत. चेन्नईचे सात गडी बाद झाले असताना धोनी येईल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.