
झगमगत्या विश्वातून कायम धक्कादायक घटना समोर येत असतात. आता देखील भयानक घटना समोर येत आहे. मुंबईतील ओशिवरा परिसरातील नालंदा सोसायटीमध्ये लेखक-दिग्दर्शक आणि स्ट्रगलिंग करणाऱ्या मॉडेलच्या घरावर अचानक गोळीबार झाल्याने गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने इमारतीवर एकापाठोपाठ एक गोळ्या झाडल्या आणि फरार झाला. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही. मात्र, या धक्कादायक घटनेने आजूबाजूच्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.
संबंधित घटना नालंदा सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर घडली, जिथे लेखक आणि दिग्दर्शक नीरज कुमार मिश्रा राहतात, तर चौथ्या मजल्यावर संघर्षशील मॉडेल प्रतीक बैद यांचं घर आहे. फायरिंगनंतर दोन्ही फ्लॅटच्या भिंतींवर गोळीबाराचे निशाण आहेत. लेखक आणि मॉडेलच्या फ्लॅटवर गोळीबार करण्यात आला.. अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच, ओशिवारा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण गोळीबार कोणी केला आहे. याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
डीसीपी झोन- 9 दीक्षित गेडाम यांनी सांगितलं की, नालंदा इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये प्रत्येकी एक गोळी लागली, परंतु कोणताही सदस्य जखमी झाला नाही. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी विविध कोनातून घटनेचा तपास करण्यासाठी अनेक पथकं तयार केली आहेत. घटनास्थळावरील अवशेष आणि खुणा तपासल्या जात आहेत.
मुंबई पोलिसांच्या पश्चिम विभागातील अतिरिक्त पोलिस आयुक्त परमजीत सिंह दहिया यांनी दिलेल्यामाहितीनुसार, इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर जमिनीवर दोन प्रोजेक्टाइल आढळले. याव्यतिरिक्त, भिंतीवर गोळ्यांचे निशाण आणि लाकडी पेटी आढळली. पोलीस प्रत्येक पैलूची कसून चौकशी करत आहेत आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयिताची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
सांगायचं झालं तर, ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा सेलिब्रिटींच्या घरावर गोळीबार करण्यात आला. याआधी अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील फ्लॅटवर गोळीबार करण्यात आला. एवढंच नाही तर, सलमान खान याला अनेकदा जीवेमारण्याची धमकी देखील देण्यात आली. त्याने विनोदवीर कपिल शर्मा याच्या परदेशातील कॅफेवर देखील गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली. एवढंच नाही तर, गोळीबाराचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.