एकनाथ शिंदे नाराज; ‘या’ आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता पक्षातील मंत्री पदे नक्की कोणाला दिली जाणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षातील काही आमदारांच्या कामगिरीवर नाराज आहेत त्यामुळे शिंदे हे भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत.
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता पक्षातील मंत्री पदे नक्की कोणाला दिली जाणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षातील काही आमदारांच्या कामगिरीवर नाराज आहेत त्यामुळे शिंदे हे भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. पक्षातील अकार्यक्षम आमदारांना डच्चू देणार असंही सांगितलं जातंय. जे कार्यक्षम मंत्री आहेत त्यांच्यावर पक्षबांधणीची जवाबदारी सोपवली जाणार. एकनाथ शिंदे नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देणार असं सूत्रांनी सांगितलं आहे.
Published on: Jan 19, 2026 01:55 PM

