Sanjay Raut | ज्या दिवशी भाजपचा महापौर होईल, त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल; संजय राऊत यांचा हल्लाबोल
कोणत्याही स्थितीत शिंदेंचा महापौर होणार नाही. मुंबईत कोणाला बसवायचं हे दिल्लीत ठरलंय, अजून ठाकरेंच्या शिवसेनेने काही ठरवलं नाही, मी मजा बघतोय, असं राऊत म्हणाले. भाजपचा महापौर होऊ नये म्हणून सहकारी पक्ष देव पाण्यात ठेऊन बसलेत. भाजपचा महापौर ज्या दिवशी होईल त्यादिवशी मुंबई शोकसागरात बुडेल.
मुंबईचा महापौर कोण होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र महापौर नक्की कोणाचा? शिंदेंचा कि भाजपचा? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. कोणालाही सहजपणे मुंबईत महापौर बसवणं सोपं नाही. कोणत्याही स्थितीत शिंदेंचा महापौर होणार नाही. मुंबईत कोणाला बसवायचं हे दिल्लीत ठरलंय, अजून ठाकरेंच्या शिवसेनेने काही ठरवलं नाही, मी मजा बघतोय, असं राऊत म्हणाले. भाजपचा महापौर होऊ नये म्हणून सहकारी पक्ष देव पाण्यात ठेऊन बसलेत. भाजपचा महापौर ज्या दिवशी होईल त्यादिवशी मुंबई शोकसागरात बुडेल, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.
Published on: Jan 19, 2026 12:56 PM

