मागचं सगळं विसरुन या महापालिकेत सत्तेसाठी भाजप-उद्धव ठाकरे एक-एक पाऊल पुढे येणार का?
चंद्रपूरात आता काही नवीन समीकरणं आकाराला येतात का? याची उत्सुक्ता आहे. भाजपकडून महापालिकेत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येत आहे. पण त्यासाठी त्यांना संख्येची जुळवाजुळव करावी लागणार आहे

मागच्या आठवड्यात राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. 25 महापालिका भाजपने जिंकल्या आहेत. आता चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसने चांगलं प्रदर्शन केलं. पण स्वबळावर बहुमत मिळवण्याइतक्या जागा काँग्रेस आणि भाजप जिंकू शकले नाहीत. चंद्रपूरमध्ये आज काँग्रेसकडे 27 आणि भाजपकडे 24 नगरसेवक आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि भाजप दोघांना इतर पक्षांची मदत लागणार आहे. उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडून आलेत. याशिवाय 2 अपक्ष, वंचित बहुजन आघाडीचे 2, बहुजन समाज पार्टीचा 1 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक निवडून आला आहे.
भाजपकडून महापालिकेत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येत आहे. पण त्यासाठी त्यांना संख्येची जुळवाजुळव करावी लागणार आहे. “शिवसेना उबाठाला कुठल्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही. वेळ पडली तर भाजप विरोधी पक्षात बसेल” भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेच्या महापौर पदाच्या मागणीवर स्पष्ट भूमिका. “तुम्ही जर भाजपचा महापौर बनवत असाल तर आम्ही तुमच्या सोबत यायला तयार असल्याचं अनेक नगरसेवकांनी म्हंटलं आहे. उबाठा सोबत देखील 2 वेळा चर्चा झाली आहे आणि पहिल्या भेटीतच महापौर पद कोणालाही देता येणार नाही हे आम्ही शिवसेनेला स्पष्ट सांगितल्याचं आणि चंद्रपूर शहराच्या विकासासाठी महापौर भाजपचाच करावा लागेल” असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
चंद्रपूर त्यापैकीच एक
या निवडणुकीत चंद्रपूर शहराने भाजपला धक्का दिला आहे. चंद्रपूरमध्ये भाजपच्या विद्यमान महापौर राखी कांचलवार यांचा काँग्रेस उमेदवाराने दारुण पराभव केला. मुनगंटीवार आणि जोरगेवारांच्या अंतर्गत वादामुळे भाजपला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे, जिथे काँग्रेसने 13, भाजपने 11, तर ठाकरे गटाने 5 जागा जिंकल्या. मागच्यावेळी भाजपने थेट 36 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे चंद्रपुरातून येतात. याआधी सुद्धा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला इथे फटका बसला होता. काँग्रेसने काही ठिकाणी चांगली कामगिरी केलीय. चंद्रपूर त्यापैकीच एक आहे. चंद्रपूरात आता काही नवीन समीकरणं आकाराला येतात का? याची उत्सुक्ता आहे.
