
Akshaye Khanna Look In Dhurandhar : आपलं नाणं किती खणखणीतपणे वाजतं ते अक्षय खन्नाने (Akshye Khanna) ‘धुरंधर’ मधून पुन्हा एकदा दाखवू दिलं आहे. या वर्षाच्या सुरूवातील आलेल्या “छावा” मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे. त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय डॉन किंवा माफिया आहे असे वाटते. अलिकडेच, ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाची कॅरेक्टर डिझायनर प्रीतीशील सिंग यांनी अक्षय खन्नाच्या लूकचे काही फोटो शेअर करतानाच त्याच्याबद्दल डिकोडिंग कसं केलं याचाही किस्सा सांगितला.
खरं तर, अक्षय खन्नाचे “धुरंधर”मधील हे पात्र केवळ कपडे आणि केशरचना इतक्यापुरतं मर्यादित नाहीये, तर प्रसिद्ध कॅरेक्टर डिझायनर प्रीतीशील सिंग यांनी साकारलेली ही एक उत्कृष्ट कलाकृती आहे. या लूकबद्दल बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा लूक अक्षय खन्नाच्या व्यक्तिरेखेची ‘शांत पण धोकादायक’ प्रतिमा दर्शवतो. या लूकमध्ये, रेहमान डकैत एकदम स्वच्छ, काळे कपडे घातलेला आहे. कुठेही फाटलेला शर्ट नाही, त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही जखमा, रक्त नाही. संपूर्ण फोस हा त्याच्या डोळ्यांवर आणि त्याच्या कठोर चेहऱ्यावरील हावभावावर आहे.
अभिनयापुढे सगळंच फिकं
पिक्चर किंवा ट्रेलक पाहिला असेल त्यांच्या हे लक्षात आलं असेल की रेहमान डकैटची भूमिका साकारणाऱ्याअक्षयचे केस फार लांब किंवा स्टायलिश नाहीत. ते खूप ‘अंडरस्टेटेड’ (साधं) आहे. हे करण्याचं कारण म्हणजे अक्षयच्या अभियावर,, त्याचा हा लूक वगैरे भारी पडू नये असं प्रीतिशील यांनी नमूद केलं. केस, किंवा इतर गोष्टी त्याला फक्त सपोर्ट करतात, पण खरा अभिनय किंवा तो जे बोलतोय ते फक्त त्याच्या डोळ्यातूनच..
हा लूक तयार करण्याचा उद्देश एवढाच होता की अक्षय खन्ना फ्रेममध्ये येताच प्रेक्षकांना त्याची इंटेंसिटी जाणवावी,असं प्रीतीशील यांनी लिहीलं . आम्हाला त्याचे णजबूत फीयर्स दाखवायचे होते, ते देखील कोणताही अतिरेकी मेकअप न करता. त्याला पाहून असं वाटलं पाहिजे जसा एखादा शिकारी शांत बसला, पण त्याचं संपूर्ण लक्ष्य शिकारीवरच आहे, असंही प्रीतीशील यांनी लिहीलं.