Akshaye Khanna : बाप के बाद बेटा भी… ‘रेहमान डकैत’चा तो डान्स अक्षयने कुठून केला कॉपी ? नेटकऱ्यांनी शोधलंच
Dhurandhar: 'धुरंधर' ने बॉक्स ऑफीसवर धमाल केली आहे. थिएटर्मध्ये पब्लिक भरभरून जातंय, पिक्चरची कमाई वाढतच चालली आहे. पण संपूर्ण चित्रपटात एक व्हिलन भारी पडला आहे, तो म्हणजे अक्षय खन्ना. त्याच्या डान्स व्हिडीओची तर सगळीकडे चर्चा आहे, सोशल मीडियावर त्याच्या क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. पण त्याचा हा जो गाजणारा डान्स आहे, तो कुठून कॉपी केला माहिती आहे का ?

Akshaye Khanna Viral Dance In Dhurandhar : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने (Dhurandhar) अख्खा माहोल सेट केला आहे. जळी, स्थळी, काष्ठी ,पाषाणी सध्या सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा आहे. 5 दिवसांतंच चित्रपटाने भारतात 150 कोटी कमावले, पण मंगळवारीही चित्रपटाची घोडदौड थांबली नाही. पण चित्रपटात खऱ्या अर्थाने चमकणारा एकमेव अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना (Akshaye Khanna) . त्याने साकारलेल्या रेहमान डकैतचं पात्र इतकं जबरदस्त जमून आलंय ना की प्रत्येकजण त्याचे चाहते बनले. या अभिनेत्याचे खूप कौतुक होत आहे. त्यातच त्याचा एक डान्स आणि गाणंही गाजत आहे. सोशल मीडियावर त्या गाण्याची क्लिप, सीन व्हायरल होत आहेत, पण त्याने या गाण्यातील डान्स स्टेप्स 36 वर्षांपूर्वीच्या डान्समधून कॉपी केल्याचीही चर्चा आहे.
‘धुरंधर’ मधील गाजलेल्या गाण्यात अक्षय खन्नाने जो डान्स केला आहे, तो कोणी कोरिओग्राफ केलेला नाही. तर खुद्द अक्षयनेच त्याच्या मर्जीने त्याच्या स्टेप्स करत तो डान्स केला आणि शूटिंग करण्यात आलं. मात्र त्याचा डान्स, स्टेप्स सर्वांना भलत्याच आवडल्या आहेत. पण आता त्याची खरी कहाणी समोर आली आहे. या डान्सच्या स्टेप्स त्याचे वडील विनोद खन्ना यांच्या डान्सशी मॅच होतात. 36 वर्षांपूर्वी जेव्हा पाकिस्तानच्या लाहोरमध्ये विनोद खन्ना यांनी तो डान्स केला तेव्हा त्याच्यासोबत काही पाकिस्तानी क्रिकेटर्सही होते. आता आक्षयने हुबेहूब तशाच डान्स स्टेप्स केल्याची चर्चा आहे.
अक्षयने कॉपी केला डान्स ?
X (पूर्वीचं ट्विटर) वर अनेकांनी विनोद खन्नाचा व्हिडीओ शेअर कला आहे. या व्हिडिओमध्ये तो काळ्या कोट आणि पँटमध्ये दिसत आहे. हात उघडे ठेवून विनोद खन्ना यांनी जी पावलं टाकत डान्स केला, ते पाहून लोकांना रेहमान डकैत (अक्षय खन्ना) च्या व्हायरल डान्सची आठवण येत आहे, ज्याचे सध्या खूप कौतुक होतंय. असं म्हटलं जात आहे की अक्षयने त्याच्या वडिलांची कॉपी केली आहे आणि त्याने हा डान्स खूप एन्जॉय केला.
Vinod Khanna and Javed Miandad encouraging Imran Khan to join them on the dance floor at a concert in Lahore, 1989. Akshaye Khanna has copied his father in Dhurandhar.#dhurandhar #AkshayeKhanna#VinodKhanna pic.twitter.com/PfbjP9H7L8
— ❥⏤⧉⃞🇭𝐞𝐚𝐫𝐭•𝐥𝐞𝐬𝐬💔⃝𓆪ꪾ=❥ (@heartless_boy2) December 9, 2025
खरंतर विनोद खन्नाचा हा व्हिडओ पाकिस्तानच्या लाहोरमधला आहे, तिथे 1989साली एक कॉन्सर्ट झाली होती. त्यावेळी अभिनेता विनोद खन्ना, रेखा, तसचे माजी क्रिकेटर आणि पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान आणि क्रिकेटपटू जावेद मियांदाद हे देखील अभिनेत्यांसोबत नाचताना दिसले होते. हा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण “धुरंधर” मधील अक्षय खन्नाचा एन्ट्री सीन व्हायरल होत आहे. ” तू त्या आठवणी ताज्या केल्यास” असं लिहीत लोकं अक्षयचे कौतुक करत आहेत.
भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर्स दिसले एकत्र
खरंतर विनोद खन्ना हा भारतातून एका चॅरिटी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लाहोरला पोहोचला होता. त्याचा एक क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आला होता, जो आता पुन्हा व्हायरल झाला आहे. तर धुरंधरमध्ये अक्षय खन्नाच्या डान्सवेळी जे गाणं वाजलं तो ट्रॅक FA9LA आहे, जो गल्फ-बेस्ड हिप-हॉप आर्टिस्ट फ्लिपराची यांनी गायला आहे. हे गाणंही सध्या खूप गाजत आहे.
