Maharashtra News Live : सत्ताधारी विरोधी पक्षनेत्यांना घाबरतात- संजय राऊत
राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे, तर आज : मुंबईतील हवेतील गुणवत्ता चांगल्या श्रेणीमध्ये असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तर सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे... यांसरख्या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ
सोन्याच्या दरात हजार 4 हजार 69 रुपयांनी तर चांदीच्या दरात 3 हजार 90 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 37 हजार 145 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 850 रुपये किलोवर पोहोचली आह. सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच चांदीच्या दराने 2 लाखांचा आकडा पार केला असून सोन्याच्या दराने 1 लाख 37 हजारांचा टप्पा ओलांडला आहे
-
नांदेडच्या देगलूर येथील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पहारा
काँग्रेसचे कार्यकर्ते शेकोटी पेटून काढत आहेत रात्र जागून. सत्ताधारी पक्ष ओट चोरी करेल म्हणून पहारा देत असल्याची भावना. निवडणूक आयोगाच्या नावाखाली भाजप सरकार षडयंत्र रचत आहे. स्ट्रॉंग रूमला पहारा देणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोप
-
-
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर आज लातूरमध्ये होणार अंत्यसंस्कार
सकाळी 11 वाजता लिंगायत समाजाच्या रितिरिवाजाप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार. यावेळी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह दिग्गज नेते अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहणार. वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने शिवराज पाटील चाकूरकर यांची प्राणज्योत मालवली. शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते.
-
आंध्र प्रदेशच्या राजमंद्रीवरून झाडांचा दुसरा कंटेनर देखील नाशिकमध्ये दाखल
दुसऱ्या कंटेनर मध्ये आणखी 350 झाडं दखल. नाशिकच्या मखमलाबाद परिसरात झाडं उतरवण्याचे काम सुरू. मखमलाबादच्या भोईर मळा परिसरात झाडांसाठी खड्डे खणण्याचे काम सुरू. सुमारे 15000 झाडं सोमवारी शहरातील विविध भागात लावले जाणार
-
संजय राऊत यांचा अत्यंत गंभीर आरोप
नुकताच संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत यांनी सत्ताधारी विरोधी पक्षनेत्यांना घाबरतात, असे म्हटले.
-
-
जायकवाडी धरणाच्या परिसरात जवळपास ५६ हेक्टर जमिनीवर नागरिकांनी केलं अतिक्रमण
जायकवाडी धरणाच्या परिसरात जवळपास ५६ हेक्टर जमिनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. अनेक वर्षापासून हे अतिक्रमण असून, ते काढणे जिल्हा परिषद आणि जलसंपदा विभागाला अडचणी येत आहे. अखेर आता या ठिकाणची अतिक्रमने काढायला सुरुवात झाली आहे. यावेळी नागरिकांनी मुलांच्या परीक्षा होई पर्यंत अतिक्रमण काढू नये अशी अधिकाऱ्यांना विचारणा केली…
-
मुंबई गोवा महामार्गावर अपघात
मुंबईकडून कोकणाच्या दिशेने जाणारी भरधाव कारने मागून कंटेनरला धडक दिली. अपघातात एकाच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. उर्वरित तीन जखमीवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड जवळच्या पुई गावाजवळची घटना आहे. अपघातग्रस्त कार मध्ये अडकलेल्या एकाला हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने बाहेर काढलं आहे..
-
-
धक्कादायक मुंबईत दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता
10 महिन्यांत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1 हजार 187 गुन्हे दाखल झाले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या 10 महिन्यांत (जानेवारी ते ऑक्टोबर) मुलींच्या अपहरणाचे 1 हजार 187 गुन्हे दाखल झाले आहेत, म्हणजेच दिवसाला सरासरी चार ते पाच मुली बेपत्ता होत आहेत.
-
नाशिक – नव्या जिल्हा परिषद इमारती बाहेर आंदोलन करण्यास मज्जाव
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. आंदोलनामुळे त्रंबक रोडवरील सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने येथे आंदोलनास बंदी घालावी असा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. आंदोलकांच्या फक्त पाच व्यक्तींच्या शिष्टमंडळाला जिल्हा परिषदेत निवेदन देण्यास अनुमती द्यावी तर आंदोलनासाठीपर्यायी जागा गोल्फ क्लब, ईदगाह मैदान येथे परवानगी देण्यात यावी.. असं पत्रात म्हटलं आहे.
-
नांदेडच्या देगलूर येथील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पहारा
काँग्रेसचे कार्यकर्ते शेकोटी पेटून रात्र जागून काढत आहेत… सत्ताधारी पक्ष मत चोरी करेल म्हणून पहारा देत असल्याची भावना अनेकांच्या मनात आहे. निवडणूक आयोगाच्या नावाखाली भाजप सरकार षडयंत्र रचत आहे. स्ट्रॉंग रूमला पहारा देणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी असे आरोप केले आहेत.
मुंबईत हवामान सुखद आणि अंशतः ढगाळ राहणार आहे. तापमान सुमारे 31°C (जास्तीत जास्त) / 20°C (किमान) असून आर्द्रता कमी (35%) आहे. दिवसभर हवामान उष्ण-सुखद राहील, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. तर सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला. सातारा शहरात 9 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली आहे. यावेळी महाबळेश्वर पेक्षा सातारा शहरात तापमान कमी आहे. महाबळेश्वर मध्ये 11 अंश सेल्सिअस तर सातारा शहरात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे बँकेंतर्गत घोटाळा प्रकरण देखील समोर आलं आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंतर्गत घोटाळा प्रकरणात अप्पर निबंधकांद्वारे चौकशी होणार. शुक्रवारी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत माहिती दिली. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी बँकेवर गंभीर आरोप लावले होते. सहकार मंत्र्यांच्या घोषणेनंतर परभणीत राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
Published On - Dec 13,2025 9:10 AM
