AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli – Anushka Sharma : असं पहिल्यांदाच घडलं… विराट-अनुष्काने खाण्याची ऑर्डर दिली अन् 18 लाखाचं कर्जच फिटलं; दोन भावांबाबत असं काय घडलं?

मुंबईतील 'दिल्ली से' रेस्टॉरंट चालवणारे जसपाल आणि महिंदर खालसा हे भाऊ लाखोंच्या कर्जात बुडाले होते. मात्र, अभिषेक उपमन्यू आणि त्यानंतर विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्या एका ऑर्डरमुळे त्यांचे नशीबच पालटले. एकेकाळी रेस्टोरंट बंद करण्याच्या विचारात असलेल्या या भावांचा आता कोट्यवधींचा व्यवसाय आहे.

Virat Kohli - Anushka Sharma : असं पहिल्यांदाच घडलं... विराट-अनुष्काने खाण्याची ऑर्डर दिली अन् 18 लाखाचं कर्जच फिटलं; दोन भावांबाबत असं काय घडलं?
| Updated on: Sep 26, 2026 | 3:13 PM
Share

आयुष्य मोठं स्ट्रेंज आहे, एखाद्याचं नशीब कधी कसं पलटेल काही सांगू शकत नाही. असंच काहीसं झालं मुंबईतील चेंबूर येथील दोन भावांसोबत. छोले भटरू विकणारे हे भावऊ एकेकाळी कर्जामुळे त्रस्त होते पण विराट कोहली (Virat Kohli)- अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) एका कॉलने त्यांच्या आयुष्याल 360 डिग्री वळण मिळालं, संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं ना भाऊ ! जसपाल सिंह खालसा आणि त्यांचा भाऊ महिंदर सिंह खालसा हे एकेकाळी 18 लाखांच्या कर्जामुळे त्यांचं मुंबईतलं रेस्टॉरंट बंद करणार होते. मात्र विराट-अनुष्काशी त्यांचं असं एक कनेक्शन बनलं की तेच भाऊ आज चार आऊटलेट्सचे मालक बनले. त्यांचा बिझनेस लॉसमध्ये होता, पण अनुष्का शर्माच्या एका ऑर्डरमुळे त्यांच्या बिझनेसमध्ये तूफान वाढ झाली. आणि पाहता पाहता तो इतका वाढला की आज ते कोट्यवधी कमावतात.

‘पिंकव्हिला’शी बातचीत करताना ‘दिल्ली से’ या रेस्टॉरंट चेनचे मालक जसपाल आणि महिंदर यांनी त्यांची कहाणी सांगितली. सप्टेंबर 2022 मध्ये स्टँड-अप कॉमेडिअन अभिषेक उपमन्यु त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आले होते आणि त्यांच्या पोस्टमुळे विराट-अनुष्काला इथल्या छोले-भटुरेंबद्दल कळलं. त्यानंतर अनुष्का आणि विराट यांनी कश ऑर्डर मागवली आणि इन्स्टाग्रामवरील एका पोस्टने या भावांचं नशीब कसं बदललं ते सांगण्यात आलं आहे.

कॉमेडिअन अभिमन्युच्या येण्याने सुरू झाली कहाणी

ही कहाणी सप्टेंबर 2022 मध्ये सुरू झाली. स्टँड-अप कॉमेडियन अभिषेक उपमन्यू चेंबूरच्या कॅम्प परिसरातील ‘दिल्ली से’ या छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये आले होते. त्यांनी तिथे छोले-भटुरे खाल्ले आणि त्यानंतर इन्स्टाग्रामवर डिशचं भरभरून कौतुक केलं. “छोले-भटुरे खाऊन मजा आली” असं अभिषेक यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. मात्र अभिषेक उपमन्यू कोण आहेत, याची त्यावेळी रेस्टॉरंटचे मालक असलेल्या जसपाल आणि महिंदर या दोन्ही भावांना कल्पनाही नव्हती. पण अभिमन्यु यांच्या पोस्टनंतर अवघ्या एक-दोन दिवसांत त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची संख्या वाढू लागली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे दोन्ही भाऊ आश्चर्यचकित झाले.

पण ही तर सुरुवात होती. लौकरच या छोट्याशा रेस्टॉरंटचे नशीब पूर्णपणे बदलणार होतं.

अनुष्काच्या घरून आला फोन

अभिषेक उपमन्यूची हीच पोस्ट अभिनेत्री अनुष्का शर्मापर्यंत पोहोचली. अनुष्का आणि विराट कोहली दोघेही दिल्लीचे असल्यामुळे मुंबईत अस्सल दिल्लीच्या चवीचे छोले-भटुरे मिळणं त्यांच्यासाठी खास होतं. 5 ऑक्टोबर 2022 रोजी अनुष्का शर्माने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. मुंबईत अगदी दिल्लीसारखे छोले-भटुरे मिळण्याचा शोध अखेर पूर्ण झाला आहे, असं तिने लिहीलं होतं. या रेस्टॉरंटची माहिती मिळवून दिल्याबद्दल तिने अभिषेक उपमन्यू यांना श्रेयही दिलं.

यानंतर जसपाल यांना अनुष्का शर्माच्या घरातून फोन आला. जुहू येथे छोले-भटुऱ्यांच्या दोन प्लेट्स पाठवण्याची ऑर्डर देण्यात आली. मात्र त्या वेळी ‘दिल्ली से’चे आउटलेट चेंबूरमध्ये होतं. एका प्लेटची किंमत होती 120 रुपये, म्हणजे 2 प्लेट्ससाठी झाले 240 रुपये. पण चेंबूरहून जुहूला ही ऑर्डर पोहोचवण्याचा खर्चच जवळपास 400 रुपये होता. त्यामुळे “ऑर्डरच्या किमतीपेक्षा डिलिव्हरीचा खर्च जास्त होईल” असं जसपाल यांनी फोनवर सांगितलं. तेव्हा समोरून त्यांना अतिरिक्त प्रवासखर्च देण्याचं आश्वासन मिळालं. मात्र हा ऑर्डर नेमका कोणासाठी आहे, याची त्यावेळी जसपाल आणि महिंदर यांना बिलकूल कल्पना नव्हती.

फोनवर बँक डिटेल्स मागितले, मला वाटलं कोणी मजा करतंय

पुढे जसपाल यांनी सांगितलं की, फोन करणाऱ्या त्या व्यक्तीने पेमेंट करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याची माहिती मागितली. त्यामुळे हा सगळा प्रकार काहीतरी मस्करी असेल असा संशय त्यांना आला. तेव्हा ऑर्डरचे पेमेंट आधी करावं लागेल असं जसपाल यांनी समोरच्या व्यक्तीला सांगितलं. तेव्हा समोरून बँक डिटेल्स पाठवण्यास सांगण्यात आलं आणि पैसे थेट खात्यात ट्रान्सफर करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. जसपाल यांनी QR कोडद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय दिला. मात्र समोरच्या व्यक्तीने QR कोडने पेमेंट करण्यास नकार दिला आणि पुन्हा बँक डिटेल्स मागितल्या. या प्रकारामुळे जसपाल आणखी गोंधळले. त्यांनी लगेच त्यांचा भाऊ महिंदरला फोन करून हा प्रकार सांगितला. एका महिलेचा वारंवार फोन येत असून ती बँक डिटेल्स मागत्ये असं त्यांनी सांगितलं.

जवळपास दहा फोननंतर समोर आलं विराट कोहलीचं नाव

दोन्ही भावांच्या म्हणण्यानुसार, काही वेळातच त्यांना जवळपास दहा फोन आले. शेवटी त्रासून जसपाल यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीला विचारलं, “तुम्हाला खरंच छोले-भटुरे हवे आहेत का? तुम्ही वारंवार फोन करत आहात, पण पेमेंट करत नाही. माझ्या बँक खात्याची माहिती मागत आहात आणि ऑर्डरची वेळही सांगत नाही.” तेव्हा आपण विराट कोहलीच्या घरातून फोन करत असल्याचं समोरच्या व्यक्तीने सांगितल.  हे ऐकून जसपाल यांना विश्वासच बसला नाही. त्यांना वाटलं कोणीतरी मस्करी करतंय. ते म्हणाले प्लीज, अशी मस्करी करू नका. मी कुठे आणि विराट कोहली कुठे ? मी तर चेंबूरमध्ये छोले-भटुऱ्यांचे छोटेसे दुकान चालवतो, असं त्यांनी समोरच्या व्यक्तीला सांगितलं. अखेर 5 ऑक्टोबर रोजी डिलिव्हरी निश्चित करण्यात आली.

दोन प्लेट्स छोले-भटुरे घेऊन विराट-अनुष्काच्या घरी पोहोचले

त्यानंतर जसपाल आणि महिंदर दोघेही छोले-भटुरे घेऊन दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. पण पुढे काय होणार आहे, याची अजिबात कल्पना नव्हती, असं जसपाल बोलताना म्हणाले. आम्ही रेस्टॉरंटमध्ये परतल्यानंतर त्याच स्टाफ मेंबरचा फोन आला. त्याने विचारलं की, “तुम्ही इन्स्टाग्रामवर आहात का?” जसपाल यांनी होकार दिला. “तुम्ही विराट कोहली किंवा अनुष्का शर्माला फॉलो करता का?” असं विचारल्यावर जसपाल यांनी नाही असं सांगितलं. तेव्हा त्या स्टाफ मेंबरने त्यांना अनुष्का शर्माची इन्स्टाग्राम पोस्ट पाठवली. तेव्हाच त्यांना कळलं की, आपण ज्यांच्यासाठी छोले-भटुरे घेऊन गेलो होतो, ते खरंच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा होते.

अनुष्काच्या पोस्टनंतर अवघ्या अर्ध्या तासात रेस्टॉरंटबाहेर गर्दी

छोले-भटुऱ्यांबद्दल अनुष्का शर्माची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच ‘दिल्ली से’ रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची अक्षरशः रांग लागली. जसपाल यांच्या म्हणण्यानुसार, पोस्टचा परिणाम अवघ्या अर्ध्या तासात दिसून आला. “रेस्टॉरंटमध्ये अचानक प्रचंड गर्दी झाली. आम्हाला काहीच समजत नव्हते. आमचे फोन सतत वाजत होते. परिस्थिती इतकी बदलली की पोलिसांनाही तिथे यावे लागले आणि एवढी गर्दी का झाली आहे, याची चौकशी करावी लागली.” असं जसपाल यांनी नमूद केलं.

कोणी सहा प्लेट्सची तर कोणी 10 प्लेट्सची ऑर्डर दिली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर पूर्ण करण्यासाठी रेस्टॉरंटकडे पुरेसा स्टॉकच नव्हता. त्यामुळे दोन्ही भावांनी आजूबाजूच्या लोकांकडून आवश्यक साहित्य गोळा करण्यास सुरुवात केली. मागणी इतकी वाढली की अवघ्या तीन दिवसांत त्यांचं उत्पादन दहापटांपेक्षा अधिक वाढलं.

जसपाल यांनी सांगितलं की, सुरुवातीला आम्ही  फक्त आठ किलो छोले तयार करत होतो. मात्र ग्राहकांची वाढती मागणी पाहता अवघ्या तीन दिवसांत हे प्रमाण तब्बल 100 किलोपर्यंत पोहोचलं. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीपर्यंत या रेस्टॉरंटला स्वतःचा खर्चही भागवणं कठीण होतं. तेव्हा रेस्टॉरंटची मासिक विक्री सुमारे 1 लाखांची होती. मात्र अनुष्का शर्माच्या पोस्टनंतर हीच विक्री वाढून तब्बल 2 कोटींवर पोहोचल्याचं जसपाल यांनी नमूद केलं.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप