Oscar 2021 : दीपा मेहताच्या ‘फनी बॉय’ चित्रपटाला मोठा धक्का!

जगभरात अत्यंत मानाच्या समजल्या जाणारा पुरस्कार कोणता तर सर्वांत पहिले नाव ‘ऑस्कर’ पुरस्कार असेल

Oscar 2021 : दीपा मेहताच्या फनी बॉय चित्रपटाला मोठा धक्का!
| Updated on: Dec 20, 2020 | 6:29 PM

मुंबई : जगभरात अत्यंत मानाच्या समजल्या जाणारा पुरस्कार कोणता तर सर्वांत पहिले नाव ‘ऑस्कर’ पुरस्कार असेल. मात्र, ‘फनी बॉय’ हा चित्रपट ऑस्कर’ पुरस्कारसाठी नॉमिनेट झाला नसल्यामुळे निमार्ता दीपा मेहता यांना मोठा धक्का बसला आहे. 93 व्या अकादमी पुरस्कार (93rd Academy Awards) मध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर चित्रपट कॅटेगरीमध्ये फनी बॉय हा चित्रपट समाविष्ट झाला नाही. दीपा या चित्रपटाच्या सह-लेख आणि सह-निर्देशिका देखील आहेत. 1970 आणि 1980 मधील दशकातील जातीय संघर्ष वेळी एक समलैंगिक तमिल मुलाची कहाणी या चित्रपटात आहे, जो श्रीलंकामध्ये राहत होता. (Funny Boy Film is not nominated for an Oscar)

आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपटाच्या श्रेणीमध्ये ऑस्करसाठी चित्रपट हा अमेरिकेच्या बाहेर तयार झालेला असावा. त्या चित्रपटात 50 टक्के संवाद विदेशी असल्या पाहिजेत. पिक्चर आर्ट्स एंड साइंसेजनुसार, मात्र, दीपा मेहताच्या या चित्रपट 1 तास 49 मिनिटांचा आहे. आणि त्यामध्ये 12 मिनिटे आणि 27 सेकंदाच्या संवादात तमिल किंवा सिंहलीमध्ये आहे.

दीपा मेहता याबद्दल म्हणाले की, “फनी बॉय चित्रपट माझ्यासाठी आणि माझ्या टिमसाठी खूपच महत्वाचा आहे. आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत फिल्म अकादमीच्या आंतरराष्ट्रीय फीचर श्रेणीमध्ये प्रतिस्पर्धामधून बाहेर पडलो यामुळे याचा विश्वास आम्हाला आतापण बसत नाहीये.
93 अॅकडमी अवार्ड्समध्ये भारताच्या मलयालम फिल्म जल्लीकट्टूला नॉमिनेट झाली आहे. भारताला या चित्रपटामुळे ऑस्करमध्ये ऑफिशियल एंट्री मिळाली आहे. चित्रपट निर्मिती गुनीत मोंगा यांनी केली आहे. 93 अॅकडमी अवार्ड्समध्ये त्यांचा चित्रपट नॉमिनेट झाल्यामुळे ते सध्या खूप आनंदी आहेत. जल्लीकट्टू चित्रपटाला लिजो जोस यांनी डायरेक्ट केले आहे. गुनीत यांची शॅार्ट फिल्म 2018 मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळवला होता.

2020 मध्ये मिळालेले पुरस्कार

सर्वोत्कृष्ट चित्रपट – पॅरासाईट
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बाँग जून हो (पॅरासाईट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रेनी झेल्विगर (ज्युडी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – हॉकिन फीनिक्स (जोकर)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लॉरा डर्न (मॅरेज स्टोरी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ब्रॅड पिट (वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड)
सर्वोत्कृष्ट मूळ गीत – आय अॅम गॉना लव्ह मी अगेन (रॉकेटमॅन)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर – जोकर
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट – पॅरासाईट
सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा – जोजो रॅबिट
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – पॅरासाईट
सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि रंगभूषा – बॉम्बशेल
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – लिटील वूमन
सर्वोत्कृष्ट दृश्य परिणाम – 1917
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – 1917
सर्वोत्कृष्ट संकलन – फोर्ड व्हर्सेस फरारी
सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण – 1917
सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – फोर्ड व्हर्सेस फरारी
सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट – लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉरझोन (इफ यू आर अ गर्ल)
सर्वोत्कृष्ट माहितीपट – अमेरिकन फॅक्टरी
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट – हेअर लव्ह
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट – टॉय स्टोरी 4
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट – द नेबर्स विंडो
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड

संबंधित बातम्या : 

Shocking : सुशांतच्या आत्महत्येनंतर आरोपीच्या पिंजऱ्यात, संदीप सिंहची अंकिता लोखंडेच्या पार्टीला हजेरी

फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार 2020 मध्ये ‘पंचायत’ आणि ‘पाताल लोक’ वेब सीरीज सर्वाधिक पुरस्काराचे मानकरी ठरले!

 

(Funny Boy Film is not nominated for an Oscar)