Gauhar Khan: ‘बिग बॉस 7’ची विजेती गौहर खानने दिली गोड बातमी; व्हिडीओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

वयाच्या 39 व्या वर्षी गौहर होणार आई; चाहत्यांना दिली 'गुड न्यूज'

Gauhar Khan: बिग बॉस 7ची विजेती गौहर खानने दिली गोड बातमी; व्हिडीओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Gauahar Khan and Zaid Darbar
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 21, 2022 | 8:04 AM

मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस 7 ची विजेती गौहर खानने 2020 मध्ये संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा झैद दरबारशी लग्न केलं. येत्या 25 डिसेंबर रोजी या दोघांच्या लग्नाला दोन वर्ष पुर्ण होतायत. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी गौहरने चाहत्यांना गोड बातमी दिली. गौहर खान आणि झैद लवकरच आई – बाबा होणार आहेत.

गौहरने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. गौहरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये दोन जण स्कूटरवर दिसत आहेत आणि स्कूटरच्या साइड कारमध्ये एक ॲनिमेटेड बेबी पहायला मिळत आहे.

गौहर आणि झैद भेटले, तेव्हा एकाचे दोन झाले, हाच प्रवास पुढे जात आता दोनाचे तीन होणार आहेत, असं या व्हिडीओत लिहिलंय. ‘तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची आणि प्रेमाची गरज आहे’, असं गौहरने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

गौहरच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनन्या पांडे, नेहा कक्कर, दिया मिर्झा यांसारख्या सेलिब्रिटींनी गौहरला शुभेच्छा दिल्या आहेत.

गौहर आणि झैदची पहिली भेट मुंबईतील एका दुकानात झाली होती. त्यानंतर झैदने गौहरला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवला. तेव्हापासून हे दोघं हळूहळू एकमेकांशी बोलू लागले. काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर 25 डिसेंबर 2020 रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली.

जेव्हा झैद आणि गौहरच्या नात्याची बातमी समोर आली, तेव्हा गौहर झैदपेक्षा 12 वर्षांनी मोठी असल्याचा चर्चांना उधाण आलं होतं. पण, खुद्द गौहरने त्यावर प्रतिक्रिया देत ही गोष्ट चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. मी झैदपेक्षा फक्त काही वर्षांनी मोठी आहे आणि या गोष्टीमुळे त्याला काही फरक पडत नाही, असं तिने स्पष्ट केलं होतं.