
मुंबई : अभिनेता राकेश रोशन (Hrithik roshan) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता देखील एका महत्त्वाच्या कारणामुळे हृतिक आणि रोशन कुटुंब तुफान चर्चेत आलं आहे. घरात एका खास पाहुण्याचं आगमन झाल्यामुळे रोशन कुटुंब आनंदी आणि उत्साही होतं सध्या सर्वत्र रोशन कुटुंबाची चर्चा रंगत आहे. महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत अविस्मरणीय क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहे. राकेश रोशन यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. रोशन कुटुंबात चक्क मोटिवेशनल स्पीकर गौर गोपाल दास आले होते. राकेश रोशन यांनी कुटुंबासाबोत काढलेला गौर गौपाल दास यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल होत आहे.
गौर गोपाल दास यांच्यासोबत फोटो पोस्ट करत राकेश रोशन यांनी कॅप्शनमध्ये, ‘गौर गोपाल दास आमच्या घरी आले आणि त्यांनी कृतज्ञतेने भरलेल्या शब्दांनी आम्हाला आशीर्वाद दिला हा खूप मोठा सन्मान होता…’ असं म्हणाले. सध्या सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त गौर गौपाल दास आणि रोशन कुटुंबाची चर्चा रंगत आहे. चाहत्यांना देखील राकेश रोशन यांनी पोस्ट केलेला फोटो फार आवडला आहे…
गौर गोपाल दास यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कायम आपल्या प्रवचणातून अनेकांना योग्य मार्ग दाखवणारे आणि कायम सकारात्मक बोलणारे गोपाल दास सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्यांना ऐकण्यासाठी तरुणवर्ग कायम उत्सुक असतो.. अशात गौर गोपाल दास यांना हृतिक रोशन याच्या घरी पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा आनंद झाला…
हृतिक रोशनबद्दल यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक मुलाखतीत अभिनेत्याने सांगितलं होतं की, धर्म नावाची कोणतीही गोष्ट नसते. काम आणि अध्यात्म यांच्यात समतोल राखायला मला आवडतं. असं हृतिक म्हणाला होता. हृतिक कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. (gaur gopal das top 10 rules)
हृतिक रोशन याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता काही दिवसांपू्र्वी सैफ अली खान यांच्यासोबत विक्रम वेधा सिनेमात दिसला होता. आता हृतिक, सिद्धार्थ आनंदच्या फायटरमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.