Gautami Patil : राधा पाटील जळून राख झाली, गौतमी पाटीलचा माधुरी दीक्षितसोबत जलवा, नेटकऱ्यांच्या कमेंटनं वेधलं लक्ष

Gautami Patil Post For Madhuri Dixit : सबसे कातील गौतमी पाटील म्हणून महाराष्ट्रात फेमस असलेली डान्सर गौतमी पाटील हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये तिने कोण होणार करोडपती या शोमध्ये माधुरी दीक्षितला भेटून काय वाटलं? याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

Gautami Patil : राधा पाटील जळून राख झाली, गौतमी पाटीलचा माधुरी दीक्षितसोबत जलवा, नेटकऱ्यांच्या कमेंटनं वेधलं लक्ष
Gautami Patil Post For Madhuri Dixit
Image Credit source: social media
| Updated on: Nov 01, 2026 | 6:37 PM

मी काही फक्त लावणी कलाकार नाही. मी वेस्टर्न गाणी आणि माझ्या स्वतःच्या गाण्यांवर नृत्य करते. लावणी नावं आलं की गौतमीचंही नाव आपोआप येतं, असं म्हणत महाराष्ट्रातील प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील ही अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या मराठी कोण होणार करोडपती शोमध्ये दिसून आली. गौतमीच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीला अख्खा महाराष्ट्र ओळखतो. अनेक मुलाखती आणि कार्यक्रमांतून गौतमी चाहत्यांसमोर येतच असते. पण तिच्या डान्सवर प्रेम करणारा एक खास चाहतावर्ग असून तिच्या लाईव्ह शोजना प्रचंड मोठी गर्दी होताना दिसते.

या सगळ्यामध्ये आता माधुरी दीक्षितच्या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्याला नेमकं काय वाटलं, याबद्दल गौतमीने एक छोटीशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटलंय की, काही भेटी या आठवणी नसतात, तर त्या आयुष्यभरासाठी प्रेरणा देऊन जाणाऱ्या ठरतात. तिच्या या शब्दांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. त्याचवेळी चाहत्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यांनीही लक्ष वेधलं आहे.

Loading...

गौतमीची नेमकी पोस्ट काय?

गौतमीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये मराठी केबीसीच्या मंचावर लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित जी हा कार्यक्रम होस्ट करते तिच्यासोबतचे तीन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये दोघीही अतिशय सुंदर दिसत असून गौतमीने माधुरीचे चरणस्पर्श केलेलेही यामध्ये दिसून येत आहे. सर्वांचे लक्ष वेधले आहे ते गौतमीने दिलेल्या कॅप्शनने. तिने लिहलं की, ‘काही भेटी या फक्त आठवणी नसतात, तर आयुष्यभरासाठी प्रेरणा देऊन जातात! एका बाजूला अभिनय आणि सौंदर्याची जादू, तर दुसऱ्या बाजूला स्वप्नांच्या प्रवासातील एक सुंदर क्षण… बॉलीवुडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित मॅम यांच्यासोबतचा हा अविस्मरणीय क्षण!’

तिच्या या पोस्टला चाहत्यांचं भरपूर प्रेम मिळत आहे. दरम्यान, या शोमध्ये गौतमी पाटीलसह शिव ठाकरेही पोहोचला होता. त्यांंच्या दोघांबरोबर माधुरीने केलेल्या गप्पांनी प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन झालं आहे . दरम्यान, या शोमध्ये गौतमीला पाहून माधुरीने एक कमेंट केलेली, ती म्हणालेली की आज आपला खेळ कातील करायचा आहे. चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या एकाने लिहिलं की, “राधा पाटील जळून जळून राख झाली असेन परत”, तर दुसऱ्या एकाने लिहिलं की, “खूपच छान ताई. कधीही न विसरणारा क्षण”, तर तिसऱ्या एकाने गौतमी पाटील सबसे कातिल असं त्याच्या प्रतिक्रियेमध्ये लिहिलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us