Web Series : ‘गुडबॉय’ला प्रेक्षकांची पसंती, मिळतोय भरभरुन प्रतिसाद

| Updated on: Mar 20, 2021 | 1:52 PM

वेब सीरीजची निर्मिती कॅफेमराठीच्या निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन यांनी केली आहे. ('Goodbye' is getting a lot of response from the audience)

Web Series : गुडबॉयला प्रेक्षकांची पसंती, मिळतोय भरभरुन प्रतिसाद
Follow us on

मुंबई : उत्तम कथानक, दमदार स्टारकास्ट असलेल्या ‘गुडबॉय’ या नव्या वेब सीरीजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ‘हंगामा प्ले’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या वेब सीरीजबद्दल अतिशय धमाल, फुल ऑन एंटरटेनिंग अशा शब्दांत प्रेक्षकांनी गुडबॉयचं कौतुक केलं आहे.(‘Goodbye’ is getting a lot of response from the audience)

‘हे’ कलाकार साकारणार महत्त्वाची भूमिका

वेब सीरीजची निर्मिती कॅफेमराठीच्या निखिल रायबोले आणि भुपेंद्रकुमार नंदन यांनी केली आहे. या वेबसीरीजमध्ये ऋषी सक्सेना,  खुशबू तावडे, विनय येडेकर, रीना अगरवाल, दुष्यंत वाघ, योगेश सोहोनी,अभ्यंग कुवळेकर आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. बद्रिश पाटील यांनी या सीरीजचं दिग्दर्शन केलं आहे. सौरभ मास्तोळी यांनी संगीत दिग्दर्शन, अक्षय राणे यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे.

कॉलेजपासून सतत मुलींच्या मागे असलेल्या तरुणाला प्रेमाचा शोध

कॉलेजपासून सतत मुलींच्या मागे असलेल्या तरुणाला खऱ्या प्रेमाचा शोध आहे. मात्र त्याच्याविषयी मुलींमध्ये त्याच्याबद्दल एक वेगळाच समज निर्माण होतो आणि तो अडचणीत येतो. हा समज नेमका काय आहे? आणि यातून त्याच्या अडचणी कशा वाढत जातात आणि या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तो काय करतो, त्यातून तो यशस्वी होतो का, त्याला खरं प्रेम मिळतं का अशा प्रश्नांची उत्तरं वेब सीरीज पाहिल्यावरच मिळतील. धमाल कथानक, उत्तम अभिनय आणि प्रत्येक एपिसोडला निर्माण होणारी उत्सुकता ही या सीरिजची वैशिष्ट्यं आहेत. त्यामुळेच ही सीरीज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे.

या प्लॅटफॉर्मवर बघता येणार वेब सीरीज

गुडबॉय ही वेबसिरीज ‘हंगामा’च्या हंगामा प्ले’ या व्हिडीओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तसंच एमएक्स प्लेयर, एअरटेल एक्स्ट्रीम अॅप, व्ही मूव्हीज अँड टीव्ही, अमेझॉन फायर टीव्ही, टाटा स्काय बिंज, डिशस्मार्ट स्टीक, डी2एच स्ट्रीम, डिशस्मार्ट हब, शिवाय मेघबेला ब्रॉडबॅंड, अलियान्स ब्रॉडबँड, एसीटी फायबरनेट आणि नेटप्लस यांच्यासारखे आयएसपी तसेच टीसीएल, वनप्लस टीव्ही, सोनी ब्राविया, सीव्हीटीई, तोशिबा आणि क्लाऊडवॉकर अशा स्मार्ट टीव्हींवर हंगामा प्ले’च्या माध्यमातून उपलब्ध आहे. त्याशिवाय, हंगामाच्या शाओमी समवेतच्या भागीदारीने ग्राहक हंगामा प्लेद्वारे ‘मी टीव्ही’वर ही सिरीज पाहू शकतील.

संबंधित बातम्या

Jui Gadkari | रुग्णामागे मिळणारे दीड लाख बंद झाल्याने कोरोनाची दुसरी लाट?” अभिनेत्री जुई गडकरीचा संताप

राजकुमारीचा थाट, दुधाने आंघोळ, अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीचा अनोखा अंदाज