AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकुमारीचा थाट, दुधाने आंघोळ, अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीचा अनोखा अंदाज

अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी दरवर्षी वाढदिवसाला दूध किंवा पंचामृताने आंघोळ करते. (Bollywood Actress Digangana Suryavanshi )

राजकुमारीचा थाट, दुधाने आंघोळ, अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीचा अनोखा अंदाज
अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी
| Updated on: Mar 20, 2021 | 12:55 PM
Share

मुंबई : ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ (The Battle Of Bhima Koregaon) या आगामी सिनेमात अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी (Digangana Suryavanshi) झळकणार आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांसह बिग बॉसमध्ये दिसलेल्या या अभिनेत्रीविषयी एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दिगांगना आपल्या वाढदिवसी दुधाने आंघोळ करते. (Bollywood Actress Digangana Suryavanshi takes Birthday Bath in Milk)

दिगांगना सूर्यवंशीचा राजेशाही थाट

23 वर्षांची दिगांगना ही ‘वीरा’ या नावानेही दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात लोकप्रिय आहे. दिगांगनाचा जन्म आणि शिक्षण मुंबईतच झालं. मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्ये तिने पदवी शिक्षण पूर्ण केलं. राजेशाही थाटात वाढदिवस साजरा करण्यावर अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीचा भर असतो. दिगांगना वाढदिवसाच्या सकाळी आई-वडिलांनी गायलेल्या ‘हॅपी बर्थडे’ गाण्याच्या सुरावटी ऐकून जागी होते. ही भावना अत्यंत स्पेशल असल्याचं ती सांगते.

वाढदिवशी दुधाने आंघोळ

दरवर्षी वाढदिवशी दूध किंवा पंचामृताने तिला नहाण घातलं जातं. मात्र हे दूध आम्ही वाया घालवत नाही. आंघोळ घालताना एका टबमध्ये हे दूध आम्ही साठवतो. त्यानंतर ते झाडांना वाहिलं जातं, असं दिगांगनाने सांगितलं.

शरद पौर्णिमेचा जन्म

आम्ही आमच्या लेकीचा वाढदिवस अत्यंत राजेशाही पद्धतीने साजरा करतो. तिचा जन्म शरद पौर्णिमेचा आहे. त्यामुळेच आम्ही तिला राजकुमारीप्रमाणे ठेवतो, असं दिगांगनाचे आई-वडील सरीता आणि नीरज सुर्यवंशी सांगतात.

बाल कलाकार म्हणून सुरुवात

2002 मध्ये वयाच्या सातव्या वर्षी ‘क्या हादसा क्या हकिकत’ या मालिकेतून बाल कलाकार म्हणून दिगांगनाने कारकीर्द सुरु केली. एक वीर की अरदास… वीरा या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. बिग बॉसच्या नवव्या पर्वातही ती सहभागी झाली होती. वयाच्या 17 व्या वर्षी बिग बॉसमध्ये सहभागी होणारी ती सर्वात तरुण स्पर्धक ठरली होती.

सनी लिओनीसोबत झळकणार

फ्रायडे आणि जलेबी या दोन चित्रपटांतून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आश्चर्य म्हणजे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी 12 ऑक्टोबर 2018 रोजी प्रदर्शित झाले होते. लवकरच अर्जुन रामपाल आणि सनी लिओनीसोबत ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटात ती दिसणार आहे.

Bollywood Actress Digangana Suryavanshi
View this post on Instagram

A post shared by Digangana Suryavanshi (@diganganasuryavanshi)

संबंधित बातम्या :

सनी लिओनीचा नऊवारीतील किलर लूक पाहिलात?

(Bollywood Actress Digangana Suryavanshi takes Birthday Bath in Milk)

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.