Google Search | गूगल इंडियाची यादी जाहिर, ‘कंगना रनौत’ दहाव्या क्रमांकावर फेकली गेली!

| Updated on: Dec 11, 2020 | 4:39 PM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या आशेवर पाणी फिरले आहे. ट्विटर आणि सोशल मिडियावर कंगना नेहमीच सक्रिय असते.

Google Search | गूगल इंडियाची यादी जाहिर, कंगना रनौत दहाव्या क्रमांकावर फेकली गेली!
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या आशेवर पाणी फिरले आहे. ट्विटर आणि सोशल मिडियावर कंगना नेहमीच सक्रिय असते. कोरोना काळातही घरी राहून ती चर्चेत होती. कंगना  नेहमीच वादग्रस्त ट्विट करते. यामुळे कंगना गूगल सर्च केलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत कंगना अव्वल असेल अशी चर्चा होती. मात्र, गूगल इंडिया प्रसिध्द केलेल्या यादीमध्ये कंगना दहाव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. (Google India list released, ‘Kangana Ranaut’ at number ten)

गूगल इंडियाने २०२० च्या सर्वाधिक सर्च केल्या जाणार्‍या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली असून त्यात पाच चित्रपट सेलिब्रिटींची नावे आहेत. कनिका कूपर तिसर्‍या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर अमिताभ बच्चन, सातव्या क्रमांकावर रिया चक्रवर्ती, नवव्या क्रमांकावर अंकिता लोखंडे तर दहावीत बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना  सध्या चर्चेत असून आहे. त्याचे कारण म्हणजे शेतकरी आंदोलना संदर्भात तिने केलेले आक्षेपार्ह ट्विट, या आक्षेपार्ह ट्विटमुळे कंगनाला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. याच दरम्यान सोशल मीडिया यूजर्सने कंगनाला टार्गेट करण्यास सुरू केली आहे. सोशल मीडियावर एका यूजर्सने कंगनाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तो, ‘रंगून’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये गेली होती त्यावेळचा आहे. कॉमेडियन कपिल शर्माने कंगनाला विचारले होते की, “तुम्ही सोशल मीडिया का वापरत नाहीत?” त्यावर कंगना म्हणाली होती की, “मला असे वाटते की सोशल मीडियावर रिकामे लोक जास्त असतात ज्यांना काहीच काम नसते. कारण ज्यांना काम असते त्यांच्याकडे वेळ नसतो सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी ”

हा व्हिडिओ शेअर करताना यूजर्सने कंगनाला आठवण करून  दिली आहे की, आता तु पण त्याच लोकांच्या वर्गात सामील झाली आहेस. कंगनाच्या टाइमलाइनवर आपण नजर टाकल्यास लक्षात येईल की, कंगनाचे 100 पैकी 90 ट्विट हे कोणाला तरी टार्गेट करणारेच असतात. आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ विषयी कंगना काय प्रतिक्रिया देते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या : 

Durgamati | ‘दुर्गामती’ च्या निर्मात्यांना कोट्यावधीचा फटका बसण्याची शक्यता!

जेव्हा पंकजांसमोर साक्षात अजित पवार-शरद पवार अवतरतात…

(Google India list released, ‘Kangana Ranaut’ at number ten)