Govinda : गोविंदा – कोमल लग्न करणारच होते पण…, 200 कोटींची भानगड काय? सुनीता अहुजाचा मोठा दावा
Govinda : अभिनेता गोविंदा आणि कोमल यांच्या लग्नाची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे, कारण नुकताच अभिनेत्याची पत्नी सुनीता हिने मोठा दावा केला आहे. शिवाय 200 कोटी रुपयांच्या संपत्तीवर देखील सुनीताने मोठं वक्तव्य केलं आहे. तर जाणून घ्या 200 कोटींची भानगड काय आहे?

Govinda : अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्याची पत्नी सुनीता हिने कोर्टात जाऊन घटस्फोटाची केस मागे घेतली आहे. असं असताना देखील गोविंदा आणि सुनीता यांच्यातील वाद चर्चेत आहे. आता सुनीता हिने गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार यांच्या नात्यावर मोठं खुलासा केला आहे. ज्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे. सांगायचं झालं तर, गुरुवारी रात्री राखी सावंत आणि सुनीता यांचं फोनवर बोलणं झालं. यावेळी सुनीता हिने गोविंदा आणि कोमल यांच्या लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे, तर जाणून घ्या राखीसोबत बोलताना सुनीता यांनी कोणता खुलासा केला.
राखी सांवत हिने गुरुवारी पापाराझींसोबत सुनीता हिला फोन केला आणि फोन स्पिकरवर ठेवला. सुनिता यांनी सोशल मीडियावरील टीका आणि गोविंदा याच्याशी संबंधित वादांवर मोकळेपणाने भाष्य केलं. एवढंच नाही तर, त्यांच्या कथित संबंधांची चर्चा सुरू असताना गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकार हे ‘लग्नाचा विचार करत होते’, असा दावाही सुनीता हिने केला.
फोनवर बोलणं सुरु असताना राखी हिने सुनीताचं समर्थन केलं आणि खंबीर राहण्याचा सल्ला दिला. शिवाय 200 कोटी रुपयांच्या संपत्तीवर देखील लक्ष ठेवण्यास सांगितलं. राखी, सुनीताला म्हणाली, ‘सर्वात आधी तर प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करुन घे, नाही तर ती (कोमल राणी स्वर्णकार) सर्वकाही घेऊन जाईल. तू जे कही केलं आहेस बरोबर केलं आहे.’
यावर सुनीता म्हणाली, ‘माझ्या सपोर्टमध्ये तुम्ही सर्वांनी बोलायला हवं, कारण सत्य काय आहे तुम्हाला माहिती आहे.’, पुढे राखी म्हणते, ‘मी कायम तुझ्या सपोर्टमध्ये आहे. सुनीता घरातील वरण – भात घरातील असतं, बाहेरचं चिकन – बटर आरोग्यासाठी हानीकारक असतं.’, यावर सुनीता म्हणते, ‘चिकन टिक्का देखील चांगलं असतं. तू पाहिलं नाही, विमानतळावर कोणासोबत फिरत होता… ते पाहून मला कसं वाटत असेल.’, सध्या राखीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गोविंदाच्या मॅनेजरने सुनीता चांगलंच सुनावलं…
बुधवारी सुनीता आहुजा आणि मुलगा यशवर्धन यांना फॅमिली कोर्टाबाहेर स्पॉट करण्यात आलं. सुनीता तिथे का आली होती? असं पापाराझींनी विचारलं असता तिने रागाने उत्तर दिलं, ‘वाढदिवस साजरा करायला आलो आहोत.” त्यानंतर, गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी दुजोरा दिला की सुनीता यांनी घटस्फोटाचा खटला मागे घेतला आहे आणि त्या या निर्णयावर समाधानी आहेत. मात्र, त्यांनी सुनीता यांच्या सार्वजनिक विधानांबद्दल नाराजी व्यक्त केली; कौटुंबिक बाबी खाजगीच राहायला हव्या होत्या, असं मत मांडत त्यांनी म्हटलं की, वैयक्तिक वाद चव्हाट्यावर आणून त्यांनी आपल्या कुटुंबाचा तमाशा केला आहे.