Govinda : तिने गोविंदाला निळ्या ड्रममध्ये..; सुनिताबद्दल हे काय बोलून गेली अभिनेत्री?

Govinda: घटस्फोटाचा अर्ज मागे घे, असा सल्ला मीच सुनिताला दिला होता, असा दावा या अभिनेत्रीने केला आहे. गोविंदा आणि सुनिता अहुजा यांच्यातील कौटुंबिक वाद सतत चर्चेत आहे.

Govinda : तिने गोविंदाला निळ्या ड्रममध्ये..; सुनिताबद्दल हे काय बोलून गेली अभिनेत्री?
Sunita Ahuja and Govinda
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 21, 2026 | 4:01 PM

सुनिता अहुजाने गोविंदाला घटस्फोट देण्याचा निर्णय मागे घेतला असला तरी या दोघांमधील वाद अद्याप काही शमला नाही. गेल्या दोन वर्षांपासून गोविंदा आणि सुनिताच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यादरम्यान सुनिताने गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप केला आहे. आता ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी राखी सावंतने यावर प्रतिक्रिया दिली आहे. गुरुवारी तिने पापाराझींसमोर सुनिता अहुजा यांना फोन केला आणि तो स्पीकरवर ठेवला. त्यावेळी सुनिताने गोविंदाबद्दल असा खुलासा केला, जे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सुनिताने सांगितलं की, जर तिने घटस्फोटाची याचिका मागे घेतली नसती तर गोविंदा दुसऱ्या लग्नाच्या तयारीत होता. या संपूर्ण प्रकरणात राखीने सुनिताला पाठिंबा दिला आहे.

याविषयी राखी म्हणाली, “सुनिता ही कुटुंबाला प्राधान्य देणारी महिला आहे. ती माझी चांगली मैत्रीण आहे. आमचं रोज बोलणं होतं. मी काय करू असं ती मला विचारत होती. त्याचे (गोविंदा) एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर थांबवण्याचा प्रयत्न करून मी थकलेय, असं ती मला म्हणायची. मीच तिला घटस्फोटाचा खटला मागे घ्यायला सांगितलं. सुनिताचं तिच्या नवऱ्यावर प्रेम आहे. तिची इच्छा असती तर तिने गोविंदाला ब्लू ड्रममध्ये फेकून दिलं असतं, त्याला कड्यावरून खाली ढकललं असतं, त्याच्या चहात विष घातलं असतं किंवा त्याला जिवंत पुरलं असतं. पण ती प्रतिष्ठित स्त्री आहे.”

यावेळी राखीने गोविंदालाही पाठिंबा दिला आहे. “गोविंदाचं कुठेही कोणतंही अफेअर नाही. तो एक हिरो आहे. प्रत्येकजण सहकलाकारांसोबत काम करतो. मी गोविंदाला गेल्या 25 वर्षांपासून ओळखते. मी त्याच्यासोबत कामसुद्धा केलंय. मी गोविंदासोबत अनेकदा एकाच रुममध्ये एकटी राहिले आहे. पण तो कोणाकडेही वाईट हेतूने पाहण्याचं धाडस करत नाही. गोविंदा आणि सुनिता दोघंही चांगले आहेत. पती-पत्नीच्या मधे येणारी ती कोण आहे? हे चुकीचं आहे. जर गोविंदाने माझ्यावर लाइन मारली नाही, तर दुसऱ्यांवर का मारेल”, असं राखी पुढे म्हणाली.

गोविंदाचं नाव अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारशी जोडलं जात आहे. ‘रुपा’ या चित्रपटात दोघं एकत्र झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच गोविंदा आणि कोमल यांना एअरपोर्टवर पाहिलं गेलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us