AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda: गोविंदा करणार दुसरं लग्न? कुंडलीतील योग पाहून पत्नी सुनिताला म्हणाला, ‘तयार राहा..’

Govinda and Sunita Ahuja: गोविंदा आणि सुनिता अहुजा यांच्यातील कौटुंबिक वाद काही केल्या संपत नाहीये, सुनिताने घटस्फोटाची याचिका मागे घेतली असली तरी गोविंदावर ती सतत काही ना काही आरोप करत आहे. आता दुसऱ्या लग्नाबद्दल गोविंदा काय म्हणाला होता, ते जाणून घ्या..

Govinda: गोविंदा करणार दुसरं लग्न? कुंडलीतील योग पाहून पत्नी सुनिताला म्हणाला, 'तयार राहा..'
गोविंदा, सुनिता अहुजा, कोमल राणी स्वर्णकारImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 21, 2026 | 11:02 AM
Share

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ अर्थात अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि तणावपूर्ण संबंधांमुळे सतत चर्चेत आहेत. गेल्या काही काळापासून त्यांच्या नात्यातील दुरावा स्पष्ट दिसत होता. सुनिताने गोविंदावर अनेक गंभीर आरोप केले होते. या सर्व घडामोडींदरम्यान सुनिताने गुरुवारी घटस्फोटाचा अर्ज मागे घेऊन सर्वांना चकीत केलं. इतकंच नव्हे तर त्यामागील कारण स्पष्ट करत तिने मोठा खुलासासुद्धा केला आहे. अभिनेत्री राखी सावंतशी फोनवर बोलताना सुनिताने सांगितलं, “मी काल केस मागे घेतली, कारण ते दोघं लग्न करणार होते.” सुनिताने गोविंदाच्या विरोधात जाहीरपणे भूमिका मांडत त्याच्या विवाहबाह्य संबंधाचा खुलासा केला. यादरम्यान गोविंदाचं एक जुनं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हणालेला गोविंदा?

एका मुलाखतीत गोविंदाने त्याच्या कुंडलीचा उल्लेख केला होता. ‘स्टारडस्ट’ मासिकाशी बोलताना गोविंदा म्हणाला होता, “उद्या काय होईल, हे मला कधीच माहीत नसतं. कुणास ठाऊक, कदाचित मी एखाद्या मुलीच्या प्रेमात पडेन. मी तिच्याशी लग्नही करेन. पण सुनितान यासाठी तयार राहिलं पाहिजे, तरच मला मोकळं वाटेल. माझ्या कुंडलीत माझी दोन लग्न होतील, असं म्हटलंय.”

राखी सावंतशी बोलताना सुनिता म्हणाली, “मी गेल्या पाच-सहा वर्षांपासून पूर्णपणे शांत आहे. मला सगळीकडून फोन येत आहेत. एक पत्नी म्हणून मला कसं वाटेल? मी काल केस मागे घेतली कारण ते लग्न करणार होते.”

आता गोविंदाचं नाव अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारशी जोडलं जात आहे. पत्नी सुनिता अहुजाने गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे आरोप केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच एअरपोर्टवर गोविंदाला अभिनेत्री कोमलसोबत पाहिलं गेलं. तेव्हापासून ही कोमल आहे तरी कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. कोमल ही राणी स्वर्णकार या नावानेही ओळखली जाते. ही नवोदित अभिनेत्री असून सध्या बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतेय. गोविंदाच्या आगामी ‘रुपा’ या चित्रपटाशी जोडली जाण्यापूर्वी कोमल विशेष चर्चत नव्हती. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ