ना हिंदू, ना शीख… गोविंदाची बायको सुनीता मानते या धर्माला, दारूसाठी धर्मच बदलला

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिचा धर्म आणि त्यांच्या आयुष्यातील अलीकडील वादविवाद यावर प्रकाश टाकणारा हा लेख आहे. सुनीताने लहानपणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, हे तिने स्वतःच एका पॉडकास्टमध्ये उघड केले आहे. गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या अफवांवर सुनीताने स्पष्टीकरण दिले आहे.

ना हिंदू, ना शीख... गोविंदाची बायको सुनीता मानते या धर्माला, दारूसाठी धर्मच बदलला
Sunita Ahuja
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 17, 2025 | 5:34 PM

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा सतत चर्चेत असते. सध्या तर गोविंदा आणि सुनीता भलतेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघांच्या घटस्फोटाच्या वावड्या उठल्या होत्या. गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेयर असल्याची चर्चा होती. त्यामुळेच दोघेही घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. यावर गोविंदाने काहीच भाष्य केलं नहाी. तर सुनीताने या अफवाच असल्याचं म्हटलं होतं. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, असंही सुनीताने म्हटलं होतं.

गोविंदाची बायको सुनीता तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. आपल्या स्वभावाने ती फॅन्सचं मन जिंकून घेते. सुनीता चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. पण तिच्या धर्माच्या बाबत किती लोकांना माहीत आहे? गोविंदा हिंदू आहे. त्यामुळे सुनीताही हिंदूच असेल असं त्याच्या फॅन्सला वाटत असेल. पण तसं नाहीये. सुनीता नेमकं कोणत्या धर्माला मानते हेच तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

वाचा: दादा कोंडके यांची झलक दिसते सूरजमध्ये; ‘झापुक झुपूक’मधील गाणे पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

कोणत्या धर्माला मानते?

गोविंदाची पत्नी सुनीता ही अर्धी पंजाबी आणि अर्धी नेपाळी आहे. 2024मध्ये ‘टाइमआउट विद अंकित’ या पॉडकास्टमध्ये तिने अनेक खुलासे केले होते. लहानपणी धर्म बदलल्याचं तिने सांगितलं होतं. सुनीताने लहानपणी आईवडिलांना न सांगता ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. तिचं शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालं होतं. याच पॉडकास्टमध्ये तिने धर्मांतर करण्याचं कारणही सांगितलं होतं.

दारूसाठी धर्मच बदलला

माझा जन्म वांद्रे येथे झाला होता. मी ख्रिश्चनांच्या शाळेत शिकत होते. माझे सर्व दोस्त ख्रिश्चन होते. येशूच्या रक्तात वाईन असल्याचं मी लहाणपणी ऐकलं होतं. तेव्हा वाईनचा अर्थ दारू हेच मला वाटत होतं. मी नेहमीच चतूर होते. दारू पिणं काही वाईट नाही. फक्त थोडीशी दारू पिण्यासाठी मी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, असं ती म्हणाली होती. असं असलं तरी सुनीता सर्वच धर्माबाबत आस्था बाळगून आहे.

1987 मध्ये विवाह

गोविंदा आणि सुनीता यांचं लव्ह मॅरेज आहे. सुनीता ही गोविंदाचे मामा आनंद सिंह यांची साली आहे. गोविंदाचं मामीच्या या बहिणीवरच प्रेम जडलं होतं. काही वर्ष डेटिंग केल्यावर दोघांनी मार्च 1987मध्ये लग्न केलं. आता लग्नाच्या 38 वर्षानंतर दोघांमध्ये वितुष्ट आल्याच्या चर्चा आहेत. पण या गोष्टीत काहीच तथ्य नाहीये, असं सुनीताने स्पष्ट केलंय.