Govindan and Sunita Ahuja : गोविंदाने पत्नी सुनिताला पुन्हा केलं फॉलो, रुमर्ड गर्लफ्रेंडबाबत काय? फ्रेंडलिस्टमध्ये आहे का ?

Govinda and Sunita Ahuja : गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा या दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याचं बोललं जात होतं. मात्र यात आता पुन्हा ट्विस्ट आल्याचं दिसत असून गोविंदा हा पत्नी सुनीताला पुन्हा फॉलो करत असल्याचं समोर आलं आहे, तो आणखी कोणाकोणाला फॉलो करतो ?

Govindan and Sunita Ahuja : गोविंदाने पत्नी सुनिताला पुन्हा केलं फॉलो, रुमर्ड गर्लफ्रेंडबाबत काय? फ्रेंडलिस्टमध्ये आहे का ?
Govinda and Sunita Ahuja
| Updated on: Aug 24, 2026 | 10:13 PM

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ अर्थात गोविंदा (Govinda ) हा गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे. त्याच्या खासगी आयुष्यासोबतच चाहते, त्याच्या सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीवरही नजर ठेवून असतात. गोविंदा हा इन्स्टाग्रामवर एकूण 25 लोकांना फॉलो करतो. काही वेळापूर्वी असं वृत्त समोर आलं होतं की गोविंदाने, त्याची पत्नी सुनिता अहुजाला अनफॉलो केलं, त्याचे काही स्क्रीनशॉट्सही व्हायरल झाले होते. मात्र आता त्यात पुन्हा बदल झाल्याचं दिसत असून तो सुनीताला फॉलो करत असल्याच्या फॉलोईंग लिस्टमध्ये स्पष्ट दिसतंय. तसंच त्याच्या लेकीला, टीना अहुजालाही गोविंदाने फॉलो केलं आहे. पण त्याच्या या लिस्टमध्ये कथित गर्लफ्रेंडचंही नाव आहे का ?

गोविंदा इन्स्टावर कोणाला करतो फॉलो?

विशेष म्हणजे, गोविंदा हा इतर काही लोकांसोबतच अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिलाही इन्स्टाग्रामवर फॉलो करतोय. गोविंदा आणि कोमल राणी यांच्या जवळिकीच्या चर्चांमुळे त्याच्या वैवाहिक नात्याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दुसरीकडे, सुनीता हिनेही यापूर्वी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. इन्स्टाग्रामवर गोविंदा हा किरण जोसेफ, विशाल गिरी, ॲडव्होकेट दीपक, शक्ती कपूर, रिझवान साजन, कपिल शर्मा, धर्मेंद्र, रणवीर सिंह, अभिषेक राय, गणेश आचार्य, चंकी पांडे आणि मीता चौधरी यांच्यासह अनेकांना फॉलो करतो.

 

सुनीताने राखी सावंतकडून मागितला सपोर्ट

सुनीता हिने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे वृत्त समोर आल्यावर त्या दोघांच्या नात्याची खूप चर्चा रंगली होती. मात्र काही दिवसांपूर्वी सुनीताने हा अर्ज मागे घेतला. अभिनेत्री राखी सावंतशी संवाद साधताना सुनीताने या निर्णयामागचं कारण स्पष्ट केलं होतं. गोविंदा दुसऱ्या लग्नाचा विचार करत असल्याची माहिती समोर आल्याचं वृत्त होतं. मात्र ते ऐकून तिला मोठा धक्का बसला. त्यामुळेच तिने आपल्या वैवाहिक नात्याचा गांभीर्याने विचार केला. राखी सावंतशी बोलताना सुनीताने आपली बाजू मांडत तिच्या पाठिंब्याची मागणी केली होती.

गोविंदा- सुनीता अहुजा यांच लग्न

दोघांच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं तर गोविंदा आणि सुनीता या दोघांनी 11 मार्च 1987 साली लग्न केलं, तेव्हा गोविंदाचं करिअर ऐन भरात होतं. त्याची सिंगल इमेज आणि फॅन फॉलोईंग कायम रहावं यासाठी त्याला लग्न गुप्त ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता. गोविंदा आणि सुनीता यांना टीना आणि यश अशी दोन मुलं आहेत.

Follow Us