
सेलिब्रिटी जेवढे महत्त्वाचे असतात त्याचप्रमाणे त्यांना तयार करणारे, त्यांना ग्लॅमर लूक देणारे मेकअप आर्टीस्ट आणि हेअर स्टायलिस्टही तेवढेच महत्त्वाचे असतात. काही सेलिब्रिटींचे हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टीस्ट कितीतरी वर्षांपासून ते आजपर्यंत त्यांच्यासोबत असतात. ते अगदी एकमेकांचे चांगले मित्र बनलेले असतात.त्यातीलच एक कलाकार म्हणजे अमिताभ बच्चन. त्यांच्यासोबत असलेले मेकअप आर्टीस्ट हे कितीतरी वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करत आहेत. पण हे फार कमी जणांना माहित असेल की त्यांच्या हेअर स्टायलिस्टसोबत एक अतिशय भयानक घटना घडली होती. ज्याबद्दल अनेकांना धक्का बसला होता.
अमिताभ यांची हेअरस्टाईल करताना हेयरस्टाइलिस्टला हार्ट अटॅक
अनमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅनची लूक किंवा ती हेअरस्टाईल प्रसिद्ध करणारे तेच हेयरस्टाइलिस्ट होते.अन् त्यांचा शेवटही अमिताभ यांची हेअरस्टाईल करता करताच झाला. नक्की काय होता प्रसंग जाणून घेऊयात.
1970 च्या दशकात, “दीवार” आणि “जंजीर” सारख्या चित्रपटांमुळे अमिताभ यांना ” अँग्री यंग मॅन” म्हणून एक नवीन ओळख मिळाली. त्यांच्या केशरचनांनीही खळबळ उडवून दिली. त्यांच्या या हेअरस्टाईल डिझाइन करणारे होते भारतीय चित्रपटसृष्टीतील टॉप हेअरस्टाईल आलिम हकीम यांचे वडील हकीम कैरनवी . ते त्यांच्या काळातील एक जबरदस्त स्टायलिस्ट होते. त्यांनी 1970 च्या दशकात अमिताभ बच्चन यांना एक अनोखी केशरचना दिली, जी हिट झाली. आलिम हकीम यांनी त्यांच्या वडिलांच्या अनेक गोड आठवणींना उजाळा दिला.
एका मुलाखतीत आलिम हकीम त्यांचे वडील आणि अमिताभ बच्चन यांच्या दीर्घ सहवासाबद्दल बोलताना म्हणाले “माझ्या वडिलांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर लगेचच बच्चन साहेबांसोबत काम करायला सुरुवात केली. ‘सात हिंदुस्तानी’ नंतर त्यांनी जे काही केले ते माझ्या वडिलांनी केले.” “रेश्मा और शेरा” हा अमितजींचा दुसरा चित्रपट होता आणि त्यात सुनील दत्त यांनी भूमिका केली होती, जे माझ्या वडिलांचे क्लायंट होते. तर, दत्त साहेबांनीच माझ्या वडिलांची ओळख करून दिली.”
अमिताभ यांच्या लोकप्रिय हेअरस्टाईलमागे हकीम कैरनवी होते
आलिम हकीम पुढे म्हणाले, “हे सहकार्य तेव्हापासून सुरू झाले आणि त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंत चालू राहिले. म्हणून, ‘शोले’, ‘जंजीर’, ‘डॉन’, ‘अमर अकबर अँथनी’ आणि ‘दीवार’ सारख्या चित्रपटांमध्ये अमिताभ यांची दिसणारी सर्व लोकप्रिय केशरचना माझ्या वडिलांमुळेच होती.”
काम करतानाच मरणं आलं
त्यानंतर आलिम हकीम यांनी त्यांच्या वडिलांच्या शेवटच्या क्षणांची भावनिक आठवण शेअर केली. आलिमच्या मते, त्यांच्या वडिलांचे शेवटचे क्षण कामावर होते. काम करताना त्यांचे निधन झाले. आलिम म्हणाले, “माझे वडील केस कापताना वारले. त्यांच्या आयुष्यातील शेवटचे केस कापण्याचे काम अमितजींचे होते. ते केस कापत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. म्हैसूरमध्ये ‘मर्द’च्या शूटिंगदरम्यान हे घडले. केस कापत असताना त्यांना छातीत दुखायला लागलं होतं आणि त्यांचे निधन झाले” त्यावेळी ते 39 वर्षांचे होते.
अलीम हकीमच्या वडिलांनी दिलीप कुमारपासून जितेंद्रपर्यंत सर्वांना केस कापले.
त्यानंतर आलिम हकीम यांनी सांगितले की त्यांच्या वडिलांनी 70 च्या दशकातील सर्व मोठ्या स्टार्सचे केस कापले होते, ज्यात दिलीप कुमार, जितेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा सारख्या नावांचा समावेश होता. आलिम यांनी स्पष्ट केले की, “केवळ भारतीय कलाकारच नाही तर आंतरराष्ट्रीय स्टार्स देखील जेव्हा जेव्हा भारतात येत असत तेव्हा ते माझ्या वडिलांना केस कापण्याची विनंती करायचे. ब्रूस ली, रिचर्ड हॅरिस, मुहम्मद अली किंवा इंग्लिश क्रिकेटपटू टोनी ग्रेग असोत, या सर्व दिग्गजांनी त्यांचे केस त्यांच्याकडून कापून घेतले.”
वडिलांच्या मृत्यूच्या वेळी घरात फक्त 13 रुपये होते.
आलिम हकीम यांनी एका मुलाखतीत असाही खुलासा केला होता की जेव्हा त्यांचे वडील गेले तेव्हा ते फक्त 7 वर्षांचे होते. त्यांनी स्पष्ट केले की त्या काळात लोक बचत करत नव्हते आणि त्यांचे सर्व पैसे खर्च होत होते. यामुळे त्यांच्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी घरात फक्त 13 रुपये होते. त्यांनी असेही स्पष्ट केले की त्यावेळी उद्योगातील कोणीही त्यांना मदत केली नाही.